मुंबई

दिवसाला 500 रूपयांचा प्रवास खर्च, गर्दीला कंटाळून प्रवाशांना सोसावा लागतोय अतिरिक्त भुर्दंड

प्रशांत कांबळे

मुंबई : लाॅकडाऊन असल्याने लोकल रेल्वे सेवा बंद आहे. त्यामूळे बेस्ट आणि एसटीच सध्या पर्याय आहे. मात्र, पिक अवर्समध्ये प्रवाशांची गर्दी वाढतच असल्याने अनेकांनी आता खासगी बसचा पर्याय निवडला आहे. मात्र, खासगी बसला अद्याप 50 टक्केच प्रवासी वाहतुकीची परवानगी असल्याने प्रवाशांना सुमारे 500 रूपयांचा प्रवास खर्च करावा लागतो आहे. 

राज्य सरकारने सध्या एसटी आणि बेस्टला 100 टक्के प्रवासी वाहतूक करण्याची परवानगी दिली आहे. अशातच लोकल सेवा बंद असल्याने, रस्ते वाहतूकीत प्रवाशांची कोंडी होत आहे. बेस्ट आणि एसटी हाऊसफुल्ल प्रवासी वाहतूक होत असल्याने, अनेकांनी कोविड-19 च्या भितीने कंपनी आणि इतर कर्मचाऱ्यांनी खासगी बसने प्रवास करण्याचा पर्याय निवडला आहे. मात्र, यामध्ये खासगी बस वाहतूकदारांना 100 टक्के प्रवासी वाहतूक करण्याची परवानगी नसल्याने, 50 टक्के प्रवासी वाहतूक करतांना, प्रवाशांना दुप्पट भाडे सहन करावा लागत आहे. 

एसटी आणि बेस्टला 100 टक्के प्रवासी वाहतूकीची परवानगी आहे. मात्र खासगी बसेसला केवळ 50 टक्के प्रवासी वाहतूकीला परवानगी आहे. त्यामूळे नाईलाजास्तव प्रवाशांना दुप्पट भाडे आकारावे लागते आहे. 

- हर्ष कोटक, मुंबई बस मालक संघंटना

मुंबई उपनगरात सध्या सुमारे 1200 खासगी बसेस प्रवासी वाहतूक करतात. एसटी, बेस्टच्या प्रवासी वाहतूकीला ज्याप्रमाणे 100 टक्के प्रवासी वाहतूकीची परवानगी दिली त्याप्रमाणेच खासगी बस वाहतूकदारांनाही 100 टक्के प्रवासी वाहतूक करण्याची परवानगी दिल्यास सामान्य जनतेलासुद्धा दिलासा मिळणार आहे. त्यामुळे राज्य सरकारने खासगी बस वाहतुकदारांना 100 टक्के प्रवासी वाहतूक करण्याची परवानगी द्यावी अशी मागणी मुंबई बस मालक संघंटनेचे हर्ष कोटक यांनी केली आहे. 

( संपादन - सुमित बागुल ) 

citizens are annoyed because they have to bare 500 rupees as one day travel cost amid corona

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BKC Metro Station: मोठी घटना! 40 फूट खोलवर लागली भयंकर आग, अग्निशमन दलाच्या आठ गाड्या घटनास्थळी

RBI: शक्तीकांता दास RBIचे गव्हर्नर राहणार की राजीनामा देणार? तुमच्या खिशावर काय परिणाम होणार?

...तर त्यांना शिवतीर्थ कसा आशीर्वाद देणार? शिवाजी पार्कवरील मोदींच्या सभेवरून आदित्य ठाकरेंचं टीकास्त्र

Malegaon Crime : पोलिसांनी पकडला प्रतिबंधित गुटखा, ११ लाख ३९ हजार ५६० रुपयांचा माल जप्त

Farmer : भरपाईपासून ५० हजार शेतकरी वंचित,गतवर्षी रब्बी हंगामात झाले होते पिकांचे नुकसान

SCROLL FOR NEXT