मुंबई

'या' राज्यातील नागरिक पितात सर्वाधिक दारू

सकाळ वृत्तसेवा

त्रिपुरा : दारू पिणे हे शरीरासाठी अत्यंत हाणिकारक असते, असे प्रत्येकालाच लहाणपणीपासूनच सांगितले जाते. मात्र तरीदेखील भारतात दारू पिण्याऱ्यांची संख्या अधिक असून एक असेही राज्य आहे ज्यातील तब्बल 62 टक्के नागरिक दारू पितात. विशेष म्हणजे यांत महिलांची संख्याही लक्षणीय आहे. एका अहवालातून ही माहिती समोर आली आहे.

आता सर्वाधिक दारू पिणाऱ्या नागरिकांचे राज्य म्हटले, तर पंजाब किंवा हरियाणाचा विचार आपल्या डोक्यात येतो. मात्र प्रत्यक्षात हे राज्य आहे ते म्हणजे पूर्व भारतातील त्रिपुरा... त्रिपुरा राज्यातील 62 टक्के नागरिक हे दारू पितात. त्रिपुरानंतर भारतातील छत्तीसगड आणि पंजाब राज्यातील नागरिक सर्वाधिक दारू पितात. या नागरिकांची संख्या अनुक्रमे 57.2 टक्के आणि 51.70 टक्के आहे. तसेच अहवालानुसार त्रिपुरा राज्यातील दारू पिणाऱ्या पुरूषांपैकी प्रत्येक पाचवां पुरूष हा संपूर्णपणे दारू अधिन गेला असून महिलांपैकी प्रत्येक 16 वी महिला  व्यसनी आहे.  

संपूर्ण देशाचा विचार केला असता 16 कोटींहून अधिक नागरिक दारू पितात. ज्यात 95 टक्के पुरूष असून त्यांचा वयोगट 18 ते 49 आहे. 

या राज्यातील दारू पिणाऱ्यांची संख्या सर्वांत कमी

भारतातील बिहार आणि गुजरात या राज्यांत दारूबंदी आहे आणि या दोन राज्यानंतर राजस्थानमध्ये सर्वात कमी म्हणजे केवळ 2.1 टक्के नागरिक दारू पितात. तसेच मेघालयमध्ये देखील केवळ 3.4 टक्केच नागरिक दारू प्राशन करतात.

web title : Citizens in 'this' state drink most alcohol

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

आमच्या विचारधारा वेगळ्या होत्या पण... बाळासाहेबांचं नाव घेण्यावरून प्रियांका गांधींचं नरेंद्र मोदींना प्रत्युत्तर

Vastu Tips: कामधेनूची मूर्ती ऑफिसमध्ये कोणत्या दिशेला ठेवावी? वाचा वास्तूशास्त्र काय सांगतं

Farmer : हिरव्या मिरचीने आणले डोळ्यांत पाणी...तोडणी बारा तर विक्रीसाठी पंचवीस रुपये; पीकांच्या लागवडीचाही खर्च निघेना

Latest Maharashtra News Updates live : संभाजीनगर विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालयाच्या परिक्षेत्रात पोलिसांना सापडले ५ कोटी रोख

Gold Price: सोने 6,000 आणि चांदी 12,000 रुपयांनी स्वस्त; ट्रम्प यांच्या विजयानंतर सोनं स्वस्त का होत आहे?

SCROLL FOR NEXT