मुंबई : नववी ते बारावीपर्यंत वर्ग सुरू करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. एक दिवसाआड 40 मिनिटांच्या चार तासिका घेण्यात येणार असून, शाळेत शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांना मास्क वापरणे बंधनकारक असल्याचे शालेय शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.
राज्यात नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांच्या शाळा 23 नोव्हेंबरपासून सुरू होणार आहेत. स्थानिक प्रशासनाने शाळा भरवताना योग्य ती खबरदारी घेण्याच्या सूचना यापूर्वी शिक्षण विभागाने जाहीर केल्या आहेत. या सूचनांचे पालन होते आहे की नाही, याची तपासणी संबंधित अधिकारी करणार आहेत. शाळा सुरू करण्यापूर्वी जिल्हा प्रशासन व महापालिकेद्वारा शिक्षकांची आरोग्य तपासणी होणार आहे. शाळेतील वर्ग खुल्या मैदानावर, मोकळ्या जागेत घेण्याची मुभा शाळा व्यवस्थापनाला दिल्याचेही वर्षा गायकवाड यांनी सांगितले. त्याचप्रमाणे स्थानिक प्रशासन, मुख्याध्यापक, शिक्षक, पालक, व्यवस्थापक व सरकार यांच्या सामुदायिक जबाबदारीवर एक दिवसआड शाळा भरवण्यात येणार आहे. शाळेत शिक्षकांनी शिकवताना व विद्यार्थ्यांनी शिकताना मास्क घालणे बंधनकारक आहे. ऑनलाईन शिक्षणात शिकवलेल्या अभ्यासक्रमाची उजळणी, शंका-समाधान व नवा विषय प्रत्यक्ष वर्गात शिकवला जाणार आहे.
यंदा परीक्षा उशिराने
कोरोनामुळे दहावी-बारावीच्या परीक्षा राज्य शिक्षण मंडळ व शिक्षण तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार घेण्यात येणार असल्याचेही शिक्षणमंत्र्यांनी स्पष्ट केले. परिस्थिती पाहता यंदा परीक्षा उशिराने होतील. विदर्भातील ऊन, कोकणातील पाऊस व इतर जिल्ह्यातील भौगोलिक परिस्थितीचा अंदाज घेऊनच मे महिन्याच्या सुरुवातीला परीक्षा होऊ शकतात, असेही त्यांनी स्पष्ट केले.
विद्यार्थ्यांवर हजेरीची सक्ती नाही
शालेय शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांचे आरोग्य आणि शिक्षण विचारात घेऊन नववी ते बारावीपर्यत वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार मंगळवारी (ता.10) शाळा सुरू करण्याबाबतच्या मार्गदर्शक सूचना जाहीर करण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांवर शाळेत हजर राहण्यासाठी कोणतीही सक्ती नसून पालकांचे संमतीपञ घेऊनच विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश द्यावा अशा सूचना शिक्षण विभागाने जारी केल्या आहेत.
Class IX XII starts Four minutes of 40 minutes allowed to take classes in the open space
------------------------------------------------
( संपादन - तुषार सोनवणे )
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.