Clean Mumbai: मुंबईच्या स्वच्छतेसाठी मुंबई महापालिकेचा प्रयत्न सुरु असून समुद्र किनारे व सार्वजनिक ठिकाणी परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी पालिकेने लक्ष वेधले आहे. अशा ठिकाणी कचरा टाकून अस्वच्छता केल्यास कारवाई करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. गेट वे ऑफ इंडिया या पर्यटन स्थळाच्या ठिकाणी समुद्रात कचरा टाकणा-या व्यक्तीवर पालिकेने १० हजार रुपये दंडात्मक कारवाई केली असल्याची माहिती प्रशासनाने दिली.
मुंबईतील सार्वजनिक ठिकाणे व समुद्र किनारे स्वच्छ ठेवण्यासाठी पालिकेने विविध उपक्रम हाती घेतले आहे. सार्वजनिक ठिकाणी कचरा, डेब्रिज टाकून मुंबई अस्वच्छ करू नका असे पालिकेकडून सातत्याने आवाहन केले जाते आहे. मात्र यानंतरही समुद्र किनारी, सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकून परिसर अस्वच्छ केला जातो आहे. पालिकेने कचरा टाकणा-यांवर नियमानुसार कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.
गेटवे ऑफ इंडिया येथील समुद्र किनारी कचरा टाकण्याचे छायाचित्र समाज माध्यमावर प्रसिद्ध झाल्यानंतर महानगरपालिका आणि मुंबई पोलिसांनी सदर कचरा टाकणाऱया व्यक्तिचा शोध सुरू केला. कचरा घेऊन आलेल्या टॅक्सीचा नंबर काढून सदर व्यक्तिची ओळख पटवणे शक्य झाले.
त्यानंतर या व्यक्तिला ए विभागातील घनकचरा व्यवस्थापन अधिका-यांनी १० हजार रुपयांचा दंड ठोठावला असल्याची माहिती मुंबई महानगरपालिका प्रशासनाने दिली. सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकून परिसर अस्वच्छ करू नये असे आवाहनही मुंबई महापालिकेने केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.