मुंबई : राज्याच्या गृह (परिवहन) विभागाने शुक्रवारी राज्य परिवहन विभागाच्या आस्थापनावरील पदांचे सुधारीत अंतीम आकृतीबंधाला मंजुरी देण्यात आली. त्यानुसार ४१४६ नियमीत पद तर बाह्ययंत्रणेद्वारे २०४ पदांना मंजुरी दिली आहे.
यामध्ये राज्यात ९ उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाच्या दर्जा वाढ झालेल्या आरचीओ अधिकाऱ्यांच्या पदांचा समावेश सुद्धा केला असून, २१ अधिकाऱ्यांच्या बढती, बदलीचा मार्ग सुद्धा मोकळा झाला आहे.
सध्या स्थितीत प्रादेशिक परिवहन अधिकारी पदावरील बदलीच्या प्रतिक्षेत राज्यातील चार अधिकारी आहे. त्यामध्ये अमरावतीचे राजाभाऊ गित्ते, ठाणे रविंद्र गायकवाड, पुणे अजित शिंदे, आणि नांदेड येथील शैलेश कामत यांचा समावेश आहे.
तर उपप्रादेशिक परिवहन अधिकारीमध्ये उस्मानाबाद गजानन नेरपगार, औरंगाबाद संजय मेत्रेवार, अकलुज अर्चना गायकवाड, आयुक्त कार्यालयातील अनिलकुमार वळीव, बोरीवली अशोक पवार, पुणे संजीव भोर, जालना विजय काठोळे, जळगाव शाम लोही, ठाणे जयंत पाटील आणि वाशिम येथील ज्ञानेश्वर हिरडे यांचा समावेश आहे.
सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यापैकी वाशिक येथील समरिन सय्यद, नागपुर (ग्रामीण ) स्नेहा मेंढे, औरंगाबाद स्वप्निल माने, जालना विजय काळे, लातुर आशुतोष बारकुल, श्रीरामपुर गणेश डगळे यांच्या समावेश आहे. या बदलीपात्र अधिकाऱ्यांच्या सेवा तपशील व बदली पसंतीक्रम परिवहन उपायुक्तांनी मागवला असून, येत्या आठवड्यात या बदल्या आणि बढत्या सुद्धा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.