मुंबई : केईएम रुग्णालयाच्या जवळपास ६ वाॅर्डचे काम गेल्या तीन महिन्यांपासून रखडले असून हे काम तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पालिका आणि रुग्णालय प्रशासनाला दिल्या आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अचानक पालिकेच्या केईएम रुग्णालयाची भेट घेतली. या भेटी दरम्यान त्यांनी काही वाॅर्डची पाहणी केली.
जनरल वाॅर्ड, आयसीयू, मध्ये भेट देऊन रुग्णांच्या नातेवाईकांशी चर्चा केली. शिवाय, केईएमच्या आयसीयु विभागाचे कौतुक करत नातेवाईक ही उपचारांबद्दल समाधान व्यक्त करत असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले. यासह बंद असलेले ६ वाॅर्डची पाहणी देखील केली. बंद असलेल्या वाॅर्ड मुळे ४०० ते ४५० रुग्णांचे अॅडमिशन इथे होत नाही. त्यामुळे रुग्णांची गैरसोय होते. युद्धपातळीवर या सहा वाॅर्डचे काम सुरु करुन आठवड्याभरात पुन्हा एकदा पाहणीसाठी येणार असल्याचे शिंदे यांनी सांगितले.
तसेच, कोणत्याही रुग्णाला पैसे नसल्यामुळे उपचार नाकारता कामा नये. ज्या रुग्णाला उपचारांसाठी मदत लागेल ती मदत पुरवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जाईल. उच्च दर्जाचे दूध आणि जेवण देऊन कोणत्याही प्रकारची भेसळ करता कामा नये. असे आढळल्यास तात्काळ कारवाई केली जाईल असे ही सांगितले.
राज्य सरकार किंवा पालिका रुग्णालये असोत रुग्णांना चांगल्या दर्जाचे उपचार मिळणे हे महत्त्वाचे आहे. पालिका रुग्णालयांना लागणाऱ्या गोष्टींसाठी आर्थिक तरतूद कमी पडू देणार नाही असे ही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.