cm eknath shinde Sakal
मुंबई

Lok Sabha Poll : शिवसेनेकडून सात नवे चेहरे रिंगणात; एकनाथ शिंदे यांची रणनीती; चार खासदारांचे तिकीट कापले

महेश जगताप

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात शिवसेना पक्ष एक अंकी संख्या लढतो की काय अशी परिस्थिती असताना तब्बल १५ जागा एकनाथ शिंदे यांनी पदरात पाडून घेऊन यापैकी तब्बल सात जागांवर नवीन चेहरे देण्याचे धाडस दाखवले. वाशीम- यवतमाळमध्ये ऐनवेळी हेमंत पाटील यांच्या पत्नी राजश्री पाटील यांना तिकीट देण्यात आले.

त्याबरोबरच छत्रपती संभाजीनगर येथेही संदिपान भुमरे यांच्या रूपाने नवीन चेहरा दिला आहे. लोकसभा निवडणुकीत शिवसेना १५ जागा लढवत असून यात तब्बल सात नवीन चेहऱ्यांना संधी दिली आहे. तर चार विद्यमान खासदारांना शिंदे यांनी घरचा रस्ता दाखवला आहे.

यामध्ये कृपाल तुमाने, हेमंत पाटील, भावना गवळी, व स्वतःहून माघारी घेतलेले गजानन किर्तीकर यांचा समावेश आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बाजूने मुंबईकरांची सहानुभूती असल्याने विशेषत: मुंबईमध्ये एकनाथ शिंदे यांना उमेदवारी देताना प्रचंड काळजी घ्यावी लागत होती.

दक्षिण मुंबई मधून यामिनी जाधव यांच्या रुपाने नवीन मराठी चेहरा दिला आहे. त्यांच्या विरोधात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) चे अरविंद सावंत आहेत. तसेच उत्तर- पश्चिम मतदारसंघातून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) चे अमोल कीर्तिकर यांना लढत देण्यासाठी रवींद्र वायकर यांना ताकद दिली आहे. ठाण्यात राजन विचारे यांना लढत देण्यासाठी विश्वासू नरेश मस्के यांच्या रुपाने नवीन चेहरा एकनाथ शिंदे यांनी दिला आहे.

शिवसेनेतील सात चेहरे

  • राजू पारवे : रामटेक

  • बाबूराव कदम कोहळीकर : हिंगोली

  • राजश्री पाटील : वाशीम -यवतमाळ

  • संदीपान भुमरे : छत्रपती संभाजीनगर

  • नरेश म्हस्के : ठाणे

  • यामिनी जाधव : दक्षिण मुंबई

  • रवींद्र वायकर : उत्तर पश्चिम मुंबई

संधी देण्याची कारणे...

  • पक्षफुटीनंतर विद्यमान खासदार दोन गटांत विभागले

  • विद्यमान खासदारांच्या मतदारसंघातील नाराजी

  • तथाकथित भाजपचा दबाव

  • नवीन कार्यकर्त्यांना संधी देण्यासाठी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Big Breaking: Navdeep Singh च्या रौप्यपदकाचे 'सुवर्ण'मध्ये रुपांतर झालं; भारतीय खेळाडूचं नशीब चमकलं, पण नेमकं असं काय घडलं?

Simran Sharma: अवघ्या १० मिनिटांत भारताला दोन पदकं; दृष्टिहीन सिमरनची २०० मीटर शर्यतीत सर्वोत्तम कामगिरीसह बाजी

Ravikant Tupkar Fasting : रविकांत तुपकरांचे अन्नत्याग आंदोलन स्थगित ; शेतकरी महिलेच्या हस्ते सोडले उपोषण

X Down: भारतासह जगभरात तासभर ट्विटर पडलं होतं बंद! नेटकऱ्यांचा संताप अन् पुन्हा झालं सुरु

Rashmika Mandana at Beed: रश्मिका मंदाना बीडमध्ये! धनंजय मुंडेंनी आयोजित केलेल्या गणेशोत्सवाच्या कार्यक्रमाला लावली हजेरी

SCROLL FOR NEXT