Uddhav-Thackeray-Amit-Shah 
मुंबई

CM उद्धव ठाकरेंची अमित शाह यांच्याशी चर्चा

मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी दिली उपाययोजनांची माहिती

विराज भागवत

मुंबई: निसर्ग चक्रीवादळाने (Nisarg Cyclone) महाराष्ट्र आणि विशेषकरून कोकण (Konkan), रायगड (Raigad) विभागात केलेला हाहाकार नागरिक अद्याप विसरू शकलेले नाहीत. अशातच रविवारी तोक्ते (Cyclone Tauktae) चक्रीवादळाचे संकट महाराष्ट्रासह चार राज्यांवर घोंघावू लागले आहे. कोकणात (Konkan) रत्नागिरी आणि किनारपट्टीच्या भागात शनिवारी संध्याकाळपासून पावसाला सुरूवात झाली. या वादळाचा तडाखा सर्वप्रथम केरळला (Kerala) बसला. तेथे वादळी वाऱ्यासह पावसाचा जबरदस्त तडाखा जनजीवनाला बसला. अनेक ठिकाणी विजेचे खांबांवर झाडे कोसळल्याने वीजपुरवठा (Power cut) खंडित झाला. या वादळाचा रोख हा गुजरात (Gujarat) दमण-दिव आणि दादरा नगर हवेलीच्या दिशेनेही आहे. महाराष्ट्रालाही (Maharashtra) या वादळाचा फटका काही अंशी बसू शकतो. याच मुद्द्यावर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray), मुख्य सचिव सीताराम कुंटे (Sitaram Kunte) यांची केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्याशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून चर्चा झाली. (CM Uddhav Thackeray Home Minister Amit Shah hold meeting on Cyclone Tauktae preparedness)

अमित शाह यांच्याशी झालेल्या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या तयारीबाबत माहिती दिली. राज्यात जर तौक्तेवादळ आलंच, तर त्याचा कमीत कमी तडाखा बसावा यासाठी काय उपाययोजना करण्यात आल्यात याबद्दल त्यांनी माहिती दिली. मुंबईत रविवार दुपारपासून वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्याबद्दल मुंबई पालिका आणि राज्य सरकारने केलेल्या उपाययोजनांचीही त्यांनी बैठकीत माहिती दिली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक शनिवारी घेण्यात आली होती. विविध राज्यांत जंबो कोविड सेंट्रर्स आहेत. जी कोविड सेंटर्स किनारपट्टीच्याजवळ आहेत अशा सेंटर्समधील रूग्णांना वेळीच सुरक्षित स्थळी हलवावे अशा सूचना पंतप्रधानांकडून करण्यात आल्या होत्या. त्याबद्दलचे पुढील अपडेट्सही राज्याचे सचिव सीताराम कुंटे यांनी बैठकीत दिले. याशिवाय, किनारपट्टीलगतच्या क्षेत्रातील नागरिकांबद्दल घेण्यात आलेली दक्षता, सखल भागात वास्तव्यास असलेली रहिवाशी वस्ती आणि विशेष पथकांची तयारी याबाबतीतही बैठकीत चर्चा करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT