कल्याण : कोरोना संकटात केवळ अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करुन न देता, रुग्णांना त्या ठिकाणी वेळेत वैद्यकीय उपचार मिळतील, ऑक्सिजनची पुरेशी व्यवस्था असेल याबाबतही दक्षता घ्यावी, अशा सूचना राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कल्याण-डोंबिवली पालिका प्रशासन तसेच येथील लोकप्रतिनिधींना केल्या आहेत. कल्याण येथील कोव्हिड चाचणी प्रयोगशाळा आणि दोनही शहरातील स्वतंत्र कोव्हिड समर्पित काळजी केंद्रांचे ऑनलाईन उदघाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी पालकमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डॉ श्रीकांत शिंदे, आमदार राजू पाटील, विश्वनाथ भोईर, रविंद्र चव्हाण, महापौर विनिता राणे, स्थायी समिती सभापती विकास म्हात्रे, विरोधी पक्ष नेते राहुल दामले, जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांसह नगरसेवक, पालिका अधिकारी उपस्थित होते.
मुंबई महानगर क्षेत्र परिसरात कोव्हिडचा वाढता प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टीने आवश्यक त्या उपाय योजना करण्याचे निर्देश यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिले. आरोग्याच्या सर्व सुविधा जनतेला उपलब्ध करुन देण्यासाठी शासन कटीबद्ध आहे. वाढती रुग्णसंख्या रोखण्यासाठी तसेच कोरोनाच्या प्रसाराला आळा घालण्यासाठी एकत्रित दर्जेदार सुविधा निर्माण करण्याबरोबरच मोठ्या प्रमाणावर ट्रेसिंग करण्यावर भर द्यावा, अशा सुचनाही त्यांनी त्यावेळी दिल्या.
कोरोना संकटाचा आपण सर्वजण समर्थपणे मुकाबला करत आरोग्य सुविधाही वाढवत आहोत, ही समाधानाची गोष्ट आहे. रुग्णांचा शोध, तपासणी आणि उपचार यावर भर देण्यात येत आहे. राज्यात यादृष्टीने 131 प्रयोगशाळा उभारण्यात आल्या आहेत. या आजारावर उपचार करण्यासाठी काही ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपात आरोग्य सुविधांची उभारणी करण्यात आली आहे. मात्र, नजीकच्या भविष्यकाळात या सुविधा कायमस्वरूपी उभ्या करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. या आजाराची व्याप्ती फारच मोठी आहे. प्रभावी औषध हातात येईपर्यंत उपलब्ध आरोग्य सुविधांमध्ये अधिक सजगतेने काम करण्याची आवश्यकता आहे. तसेच उपचारांची गाईडलाईन तपासून घेण्याची आवश्यकता असून, राज्याच्या कृती दलाकडून संबंधित यंत्रणेला मार्गदर्शन उपलब्ध करून देण्यात येईल, असेही ते यावेळी म्हणाले.
कोरोनाचे आव्हान पेलण्यासाठी ठाणे जिल्हा सज्ज असून, येणाऱ्या काळात या भागातील संसर्ग परिणामकारकरित्या रोखू. उत्तम सुविधांची उभारणी करु. कल्याण डोंबिवली महापालिका परिसरात रुग्णांचे वाढते प्रमाण लक्षात घेता कॉन्टॅक्ट ट्रेसिंगचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढविले आहे.
- एकनाथ शिंदे, पालकमंत्री, ठाणे.
समर्पित झालेल्या वास्तू
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.