तांबडी ठिय्या आंदोलनाची मुख्यमंत्र्यांकडून दखल; कुटुंबाशी दुरचित्रसंवादाद्वारे केली चर्चा  
मुंबई

तांबडी ठिय्या आंदोलनाची मुख्यमंत्र्यांकडून दखल; कुटुंबाशी केली दुरचित्रसंवादाद्वारे चर्चा!

महेंद्र दुसार

अलिबाग : रोहा तालुक्यातील तांबडी येथील पीडीत मुलीला न्याय मिळावा यासाठी ग्रामस्थांनी केलेल्या ठिय्या आंदोलनाची मुख्यमंत्र्यांनी दखल घेत पिडीत कुटुंबाशी दुरचित्रसंवादाद्वारे संवाद साधला असून सर्व मागण्या मान्य केल्या आहेत.

राज्य सरकारने या प्रकरणात ज्येष्ठ वकील उज्वल निकम यांची 27 ऑगस्ट रोजी नेमणूक केली असून आरोपींच्या विरोधात आठ दिवसांत चार्जशीट दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. मराठा समाज समन्वयक राजन घाग यांनी जनभावना मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिल्या. या व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये पीडीत मुलीचे वडील व कुटुंबिय तसेच घोसाळे सरपंच प्रतिभा पार्टे, वाली सरपंच उद्देश देवघरकर यांनी स्थानिकांच्या वतीने तर शासनाच्या वतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहमंत्री अनिल देशमुख, पालकमंत्री आदिती तटकरे, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, रायगड पोलीस अधीक्षक अनिल पारसकर यांनी सहभाग घेतला होता. 

सुमारे 40 मिनिटे चाललेल्या या चर्चेत पीडितेचे कुटुंबिय व इतर प्रतिनिधी यांनी केलेल्या बहुतांश मागण्या मान्य करण्यात आल्या असल्याची माहिती चंद्रकांत पार्टे यांनी दिली आहे. पंचक्रोशीतील ग्रामस्थांच्या मागण्यांची मुख्यमंत्र्यांनी तातडीने दखल घेतल्याने समाधान व्यक्त केले जात आहे.
--------------------------
(संपादन : गोरक्षनाथ ठाकरे)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Result: मतदारांनी विरोधकांना तोंडघशी पाडले, आम्ही विक्रम मोडले, भाजप नेत्याने मविआला डिवचले

Virat Kohli Hundred: विराटने ८१ व्या शतकासह रचले विक्रमांचे इमले अन् नंतर बुमराह-सिराजकडून ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजी सुरूंग

Ram Satpute : भाजपमधील अंतर्गत कलह चव्हाट्यावर, राम सातपुतेंनी केली 'या' मोठ्या नेत्याच्या हकालपट्टीची मागणी

Jalgaon Assembly Election 2024 Result : मंत्री गुलाबराव पाटील यांची गाडी सुसाट; विरोधक संपण्याच्या मार्गावर

South Maharashtra Election : दक्षिण महाराष्ट्रत महायुतीचा डंका,‘मविआ’चा विचका

SCROLL FOR NEXT