मुंबई

समुद्राचे पाणी गोडे करण्याचा प्रकल्प उभारणार, मुख्यमंत्र्यांचे पालिकेला निर्देश

समीर सुर्वे

मुंबईः समुद्राचे पाणी गोडे करण्याचा प्रकल्प उभारणार, मुख्यमंत्र्यांचे पालिकेला निर्देशमनोरी येथे समुद्राचे 200 दशलक्ष लिटर पाणी गोडे करण्याचा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी  1800 कोटी रुपये खर्च होणार आहे.  1 हजार लिटर पाणी पिण्या योग्य करण्यासाठी 30 रुपयांपर्यंत खर्च येण्याचा अंदाज आहे. तलावातील पाणी शुध्द करुन ते मुंबईत पोहोचविण्यासाठी महापालिका 1 हजार लिटर पाण्यासाठी  16-17 रुपये खर्च करते.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारी या प्रकल्पाचा आढावा घेऊन पुढील प्रक्रिया सुरु करण्याचे निर्देश पालिकेला दिले आहे. वर्षा निवासस्थानी झालेल्या बैठकीत मनोरी येथे हा प्रकल्प उभारण्याबाबत चर्चा करण्यात आली. मनोरी येथे सरकारचा भुखंड असून तेथे रस्तेही आहेत. या ठिकाणी हा प्रकल्प उभारण्याबाबत विचार सुरु आहे. वर्षा निवासस्थानी झालेल्या बैठकीत उपनगरचे पालकमंत्री आदित्य ठाकरे,  महापौर किशोरी पेडणेकर, पालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजोय महेता, अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, पालिकेचे अतिरिक्त आयुक्त पी. वेलरास उपस्थित होते.

मनोरी येथे 25 ते 30 एकरामध्ये हा प्रकल्प उभा करण्याचा प्रस्ताव असून 200 एमएलडी क्षमतेचा हा प्रकल्प भविष्यात क्षमता वाढविण्यासाठी सोयीस्कर आहे. हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी साधारत: अडीच ते तीन वर्षांचा कालावधी लागणार असून प्रकल्पासाठी आंदाजे 1600 कोटी इतका खर्च अपेक्षित आहे. निर्मिती खर्च 3 ते 4 पैसे लिटर इतका खर्च येणार असल्याचे आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी सादरीकरणात सांगितले.

पावसाळ्यापूर्वीची पाणी कपात टळेल

पावसाला विलंब झाल्या मे- जूनमध्ये मुंबईत 10-15 टक्के पाणी कपात करावी लागते. समुद्राचे पाणी पिण्यासाठी उपलब्ध झाल्यास ही कपात करण्याची गरज भासणार नाही. काही देशांमध्ये असे प्रकल्प उभारले जात आहे. सौर ऊर्जेवर हा प्रकल्प राबविल्यास निर्मिती खर्चही कमी लागणार आहे. मनोरी येथे पाण्याची गुणवत्ता चांगली आहे. पायाभूत सुविधा सहज उपलब्ध होऊ शकतात. मनोर येथे सरकारचा भूखंड उपलब्ध आहे. तसेच रस्तेही उपलब्ध आहेत. या ठिकाणी नागरी वसाहत नसल्याने हा प्रकल्प विना व्यत्यय पूर्ण होऊन कपातीविना नियमित पाणी पुरवठा होणार आहे, असे मुख्यमंत्री ठाकरे यांनी नमूद केले.

-------------------

(संपादन- पूजा विचारे)

CM will direct a project to desalinate sea water

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MNS Manifesto: विषय बदलले नाहीत, प्रश्न तेच.. आता आम्ही करू; असं म्हणत राज ठाकरेंचा जाहीरनामा प्रसिद्ध, काय आहे खास?

IND vs AUS: ऋषभ पंतच्या बॉलिंगवर जसप्रीत बुमराहची फटकेबाजी! पाहा हा BCCI Video

१० पैकी १०! Mumbai Indians च्या वेगवान गोलंदाजाने डावात दहा बळी टिपले, Ranji Trophy त ३९ वर्षानंतर असे घडले

Devendra Fadnavis: ''मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत मी नाही'', देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान; तावडेंच्या भूमिकेनंतर स्पष्टच बोलले

Memorable Trip Ideas: लग्नाआधीची तुमची ट्रीप स्मरणीय करायची आहे? मग 'असे' नियोजन करून पहा

SCROLL FOR NEXT