मुंबई

स्टार्ट अप सुरु करताय; जागा नाहीये ? नो टेंन्शन !

सकाळ वृत्तसेवा

नवी मुंबई : लघु उद्योजक, फ्रीलान्सर्स, स्टार्टअपसारख्या छोटी गुंतवणूक असणाऱ्या तसेच ऑफिस स्पेस व ऑफिसकरता लागणाऱ्या अत्याधुनिक सेवा-सुविधांवर वारेमाप खर्च करणे ज्या व्यावसायिकांना परवडत नाही, अशांकरता तसेच तुमच्या कम्फर्ट झोनचा विचार करून कार्यालयासाठी जागा (ऑफिस स्पेस) तसेच आवश्‍यक सुविधा पुरवणारी ‘को वर्किंग स्पेस’ ही संकल्पना मूळ धरू लागली आहे. बेंगळूरु, मुंबईनंतर आता नवी मुंबईतही वाशी, तुर्भे, सीवूडस्‌ येथे को-वर्किंग स्पेस उपब्ध करणाऱ्या कंपन्यांचा शिरकाव होऊ लागला आहे.


नवी मुंबई शहराची ओळख आता ‘कॉर्पोरेट बिझनेस हब’ म्हणून होऊ लागली आहे. जागेची मुबलकता तसेच मुंबई आणि पुणे शहर जवळ असल्याने शहरात मोठ्या प्रमाणावर स्टार्ट अप उद्योग, प्रथितयश कंपन्यांची मुख्यालये, आयटी कंपन्यांची बॅक ऑफिस स्थलांतरित होत आहेत. येत्या काही वर्षांत आयटी आणि इतर कंपन्यांची कार्यालयेदेखील सुरू होणार आहेत.

ही बातमी वाचा ः नेरुळमध्ये दिवसाढवळ्या घडला हा प्रकार; तक्रार दाखल
केंद्र सरकारने स्टार्टअप उद्योगांना प्रोत्साहन देण्याकरता नवीन योजना आणल्या, परंतु नव्याने व्यवसाय करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला वा व्यावसायिकाला एखादी टीम नेमण्यापासून ऑफिसकरता नवे कार्यालय ओघाने येणाऱ्या सोयी-सुविधा (टेबल-खुर्च्यांपासून कम्प्युटर, इंटरनेट, फॅक्‍स, प्रिंटर, सीसीटीव्ही) पुरवणे वा त्यावर खर्च करण्याइतपत भांडवल नसल्याने को वर्किंग स्पेस म्हणजेच इतर व्यावसायिकांबरोबर जागा शेअर करण्याची संकल्पना वा या सर्व सुविधा उपलब्ध असलेली जागा कमीत कमी खर्चात भाड्याने देणाऱ्या कंपन्या हळूहळू नवी मुंबईतही येऊ लागल्या आहेत.

ही बातमी वाचा ः नागराज म्हणतो नवं वर्ष नवं जावं; वाचा पुर्ण कविता
तरुणांमध्ये ‘को वर्किंग स्पेस’ची क्रेझ

‘को वर्किंग स्पेस’ संकल्पनेंतर्गत एखाद्या ऑफिसमध्ये असलेल्या सर्व सुविधा तुम्हाला सहज उपलब्ध होतातच, पण त्याचबरोबर कॅफेट एरिया, गेमिंग एरिया यांसारख्या सुविधाही दिल्या जातात. विशेष म्हणजे एका दिवसापासून महिनाभर व सहा, बारा महिन्यांच्या अवधीकरताही ऑफिस स्पेस, डेस्क स्पेस, मीटिंग रूम उपलब्ध केल्या जातात. तरुण उद्योजकांमध्ये ही संकल्पना मूळ धरण्याचे कारण म्हणजे इथे काम करताना तुमच्या कम्फर्ट झोनला किंचितही धक्का दिला जात नाही. तुम्हाला तुमच्या आवडत्या शीतपेयाची वा खाद्यपदार्थाची चव घेत; आवडते संगीत ऐकत काम करू शकता.

को-वर्किंग स्पेस देणाऱ्या कंपन्या व त्यांचे दर
 वी वर्क : को वर्किंग स्पेस देणारी ही अग्रणी संस्था आहे. सीवूडस येथील एसजीसी मॉलमध्ये या कंपनीचे को वर्किंग स्पेस उपलब्ध आहे.
 हॉट डेस्क : ५ हजार रुपये प्रतिमहिना
 डेडिकेटेड डेस्क : १२ हजार रुपये प्रतिमहिना
 प्रायव्हेट ऑफिस : १७ हजार रुपये प्रतिमहिना
 ९१ स्प्रिंग बोर्ड : तुर्भे येथे या कंपनीचे वर्किंग स्पेस उपलब्ध असून येथे महिनाभर मोफत ऑफिस स्पेस, क्‍लाऊड कॉम्पुटिंगही उपलब्ध आहे.
 प्रायव्हेट केबिन १० हजार २०० रुपये प्रतिमहिना
 डेडिकेटेड डेस्क : नऊ हजार रुपये प्रतिमहिना
 पार्ट टाइम डेस्क : सहा हजार ५०० रुपये प्रतिमहिना
 डे पास : ६४९ रुपये
 झूमस्टार्ट, बेलापूर : डेडिकेटेड डेस्क दर महिना पाच हजार रुपयांपासून उपलब्ध
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dolly Chaiwala: डॉली चायवाला भाजपचा स्टार प्रचारक! नागपूरमध्ये केला महायुतीसाठी प्रचार

SA vs IND: 23 Six, 17 Fours! जोहान्सबर्गच्या मैदानात सॅमसन-तिलकचं वादळ; भारताचं द. आफ्रिकेला तब्बल 284 धावांचं लक्ष्य

SA vs IND: संजू सॅमसनने तिसऱ्या शतकासह रचला इतिहास! तिलक वर्मानेही ठोकली सलग दुसरी Century

Assembly Elections: २४ ते ३० मतदारसंघ महत्त्वाचे! दोन्ही आघाड्यांना बंडाचा फटका बसणार,'शांती' यज्ञासाठी पळापळ सुरू

Dhruv Rathee: ध्रुव राठीचं चॅलेंज आदित्य ठाकरेंनी स्वीकारलं! ‘मिशन स्वराज’साठी शेअर केली मुद्द्यांची यादी

SCROLL FOR NEXT