Mumbai Mid Day Meal 
मुंबई

Mid Day Meal: मुंबईतल्या शाळेत मध्यान्ह भोजनात आढळलं झुरळ; विद्यार्थ्यांच्या जीवाशी होतोय खेळ

Amit Ujagare (अमित उजागरे)

Cockroach in Ghatkopar School marathi news : मुंबईतल्या एका शाळेत विद्यार्थ्यांच्या पोषण आहारात झुरळ आढळून आलं आहे. यावरुन विद्यार्थ्यांसाठीच्या जेवणाचा दर्जा राखला जात नसल्याचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या प्रकरणाची प्रशासनानं गांभीर्यानं दखल घेणं गरजेचं आहे. कारण यामुळं विद्यार्थ्यांच्या जीविताशी खेळ होत असल्याची भावना पालकांमधून व्यक्त होत आहे.

कुठल्या शाळेत घडली घटना?

घाटकोपरच्या केव्हीके शाळेत मध्यान्ह भोजनात हे झुरळ आढळून आलं आहे. दुपारच्या शिजवलेल्या खिचडीमध्ये हा किटक आढळून आला आहे. आठवीच्या विद्यार्थिनीला डब्यामध्ये ही खिचडी वाढण्यात आली तेव्हा त्यामध्ये झुरळ दिसून आलं, या विद्यार्थीच्या हे लक्षात आल्यानंतर तिनं शिक्षकांच्या लक्षात ही बाब आणून दिली.

मध्यान्ह भोजन योजना काय?

मध्यान्ह भोजन योजना ही भारत सरकारची योजना असून शालेय विद्यार्थ्यांना शाळेत पौष्टिक आहार दिला जातो. विद्यार्थ्यांचं आरोग्य सुदृढ राहावं आणि कुपोषणापासून रक्षण व्हावं हा या योजनेचा उद्देश आहे. तसंच तळागळातल्या गरीब विद्यार्थ्यांनीही शाळेत हजेरी लावावी यासाठी प्रोत्साहनपर हा उपक्रम आहे. या योजनेंतर्गत दुपारच्या वेळेत शाळेत विद्यार्थ्यांना खिचडी हा पोषण आहार दिला जातो. पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना वर्षातील २०० दिवस दररोज ८ ग्रॅम प्रोटीन आणि ३०० कॅलरी ऊर्जेचा समावेश असेल असं जेवण दिलं जातं.

सन २००१ मध्ये सुप्रीम कोर्टानं राज्य सरकार आणि केंद्र सरकारला ही योजना लागू करण्याचे आदेश दिले होते. तामिळनाडूनं ही योजना सर्वात आधी लागू केली होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lebanon Pager Blast: लेबनानच्या पेजर स्फोटाशी केरळच्या तरुणाचं कनेक्शन! केरळ पोलिसांच्या तपासात काय झालंय उघड?

Ruturaj Gaikwad: फिल्डिंगमध्येही दिसला ऋतुचा 'राज', डाव्या हाताने भारी कॅच पकडत रियान परागला धाडलं माघारी

IND vs BAN, 1st Test: 'बॅड लाईट'मुळे तिसऱ्या दिवसाचा खेळ थांबला, भारताला विजयासाठी ६ विकेट्सटची गरज

Latest Marathi News Updates : मंत्री मंगल प्रभात लोढा, आमदार प्रसाद लाड हे धारावी पोलीस स्टेशनमध्ये दाखल

OYO Hotels: आता अमेरिकेत सुद्धा होणार ओयोची हवा! 43 अब्ज रुपये गुंतवून घेतला मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT