मुंबई

डेंजर प्रकार ! वडा पाव खा, कोरोना पळवा... मुंबईत काहीही होऊ शकतं !

मिलिंद तांबे

मुंबई - माहुल मध्ये कोरोना रुग्ण सापडल्यानंतर काही इमारती सील करून रहिवाश्यांना क्वारंटाईन केले. क्वारंटाईन केलेल्या रहिवाश्यांना पालिका सकस आहार म्हणून चक्क वडा-पाव खायला देते. यामुळे राहिवाश्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असून पालिके विरोधात संताप व्यक्त होतोय. 

माहुल हा मुंबईतील प्रदूषित परिसर असून इथे वेगवेगळ्या जीवघेण्या आजारांचे प्रमाण मोठे आहे. कोरोना आजाराने ही आजारांमध्ये अधिक भर घातली. माहुल मधील इमारत क्रमांक 32 , 36 आणि 53 मध्ये तीन कोरोना बाधित रुग्ण सापडल्याने पालिकेने या इमारती सील केल्या. पॉझिटिव्ह रुग्ण आणि पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात आलेल्या अती जोखमीच्या व्यक्तींना माहुल गावातील क्वारंटाईन सेंटर मध्ये ठेवण्यात आले असून त्या क्वारंटाईन सेंटरमध्ये गोवंडी, चिंता कॅम्प, वाशी नाका परिसरातील 100 पेक्षा अधिक लोकं आहेत. 

क्वारंटाईन सेंटर मधील लोकांची मात्र मोठ्या प्रमाणावर कुचंबणा सुरू आहे. क्वारंटाईन केलेल्या व्यक्तींना सकस आहाराची गरज असतांना नाष्टयामध्ये लोकांना चक्क वडा पाव खायला दिला जातोय अशी तक्रार या क्वारंटाईन सेंटर मधील एका महिला रुग्णाने केली आहे. तेलकट, थंड वडा पाव खाऊन आजारी पडण्याची लक्षणे आहेत.  त्यामुळे इथल्या लोकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

इथल्या टॉयलेट मध्येही पाणी नसल्याचे समोर आले आहे. तरी देखील इथल्या लोकांना तेच टॉयलेट वापरावे लागत आहेत. दोन दिवसात पाण्याची व्यवस्था करण्यात येईल असे वारंवार सांगण्यात आले असले तरी पाण्याची व्यवस्था अद्याप झालेली नाही असा आरोप ही तिने केलाय. तक्रार केल्यानंतर रुग्णांना दिवसाला केवळ 200 लिटर पाणी पिण्यासाठी दिले जातेय. मात्र एवढ्या पाण्यात त्यांची तहान भागली जात नाही. याबाबत इथल्या लोकांनी तक्रारी ही केल्या मात्र काहीही सुधारणा झालेली नाही. त्यामुळे अखेर तिने आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याकडे मेलद्वारे तक्रार केली आहे.

पालिकेच्या या हलगर्जीपणामुळे लोकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. लोकांना कोरोना पेक्षा इथल्या असुविधांची अधिक भीती वाटू लागली आहे. याबाबत सामाजिक कार्यकर्ते घनश्याम सोनार यांनी आरोग्य मंत्री राजेश टोपे, आमदार अबू असीम आझमी यांच्याकडे तक्रार केली आहे. कोरोना सारख्या संसर्गाशी झुंजणाऱ्या लोकांना राहण्याची योग्य जागा, स्वच्छ पाणी नाही दिले तर तर कोरोना शिवाय लोकांची तब्येत खालावण्याची शक्यता आहे. अश्यात पालिकेच्या एम पूर्व विभाग अधिकाऱ्याने या समस्यांकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे ही सोनार यांनी सांगितले. याबाबत एम पूर्व मधील सहाय्यक आयुक्तांशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही.
 

cold vadapav is served to people staying in quarantine center pf mahul mumbai

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Election: मतदारांना भुलवण्यासाठी गैरप्रकारांचा सुळसुळाट! आचारसंहिता भंगाच्या ६ हजारापेक्षा अधिक तक्रारी

Latest Maharashtra News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? जाणून घ्या एका क्लिकवर

Ultraman Dashrath Jadhav : डोर्लेवाडीतील लोहपुरुष ठरला ‘अल्ट्रामॅन’चा मानकरी; दशरथ जाधव यांनी वयाच्या ६६ व्या वर्षी जिंकली अत्यंत खडतर स्पर्धा

Maharashtra Assembly Election 2024 : निवडणुकीमुळे राज्यातील शाळांना तीन दिवस सुट्टी

Reliance And Diseny: अखेर झाली घोषणा! रिलायन्स-डिस्ने आले एकत्र; 70,352 कोटींचं जॉईन्ट व्हेंचर; नीता अंबानींवर अध्यपदाची जबाबदारी

SCROLL FOR NEXT