actor birbal passed away SAKAL
मुंबई

Actor Birbal : शोले फेम विनोदी अभिनेते बिरबल यांचे निधन

हिंदीबरोबरच मराठी, गुजराती, भोजपुरी चित्रपटांमध्ये काम करणारे ज्येष्ठ अभिनेते बिरबल यांचे आज सायंकाळी अंधेरी येथील एका खासगी रुग्णालयात निधन झाले.

प्रशांत पाटील

मुंबई - हिंदीबरोबरच मराठी, गुजराती, भोजपुरी चित्रपटांमध्ये काम करणारे ज्येष्ठ अभिनेते बिरबल यांचे आज सायंकाळी अंधेरी येथील एका खासगी रुग्णालयात निधन झाले. ते ८५ वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिवावर उद्या (ता. १३) अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत.

पंजाबमधील गुरुदासपूर येथे जन्मलेल्या बिरबल यांचे मूळ नाव सतिंदरकुमार खोसला असे होते. त्यांच्या वडिलांचा प्रिंटिंग प्रेसचा व्यवसाय होता. बिरबल यांनी तो व्यवसाय करावा अशी त्यांच्या वडिलांची इच्छा होती. परंतु चित्रपटामध्ये काम करावे असे बिरबल यांचे स्वप्न होते. बिरबल यांची हिंदी चित्रपटसृष्टीतील एन्ट्री धमाकेदार झाली.

1966 मध्ये त्यांनी दो बंधन या चित्रपटात पहिल्यांदा काही संवाद कॅमेऱ्यासमोर बोलले. पुढच्याच वर्षी त्यांनी मनोज कुमार यांच्या उपकारमध्ये आपल्या अभिनयाची झलक दाखवली. चार्ली चॅप्लिन, बूंद जो बन गई मोती, शोले यांसारख्या अनेक चित्रपटातून त्यांनी आपले अभिनय कौशल्य दाखवून दिले. त्यांच्या उत्कृष्ट कॉमिक टायमिंगसाठी ते ओळखले जात होते.

रोटी कपडा और मकान, क्रांती, अमीर गरीब, मेरा आशिक, जाना पहला, अंजाम आणि फिर कभी यांसारख्या चित्रपटांमधून त्यांनी आपल्या अभिनयाची छाप प्रेक्षकांवर पाडली. हिंदीबरोबरच अन्य भाषांतील जवळपास पाचशे चित्रपटांमध्ये त्यांनी छोट्या मोठ्या भूमिका साकारल्या. मनोज कुमार, धर्मेंद्र, मेहमूद यांच्याबरोबर त्यांनी अधिक चित्रपट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: '...तर उद्धव येतोच कसा आडवा?', भोंग्यांवरून राज ठाकरेंनी सुनावलं, नेमकं काय म्हणाले?

Biotech IPO : 'ही' बायोटेक कंपनी आणणार 600 कोटीचा आयपीओ,अधिक जाणून घेऊयात...

Fact Check : इस्लामिक झेंडे फडकवत निघालेली बाईक रॅली अकोल्यातील काॅंग्रेस उमेदवाराच्या प्रचाराची नाही, व्हायरल दावा खोटा

'मुश्रीफ खूप प्रामाणिक नेता, त्यांना कोणतेही लेबल लावू नका'; शरद पवारांना उद्देशून काय म्हणाले प्रफुल्ल पटेल?

Aditya Thackeray : महाविकास आघाडी जिंकली नाही तर गुजरात जिंकेल; आदित्य ठाकरेंचा घणाघात

SCROLL FOR NEXT