वाशी - नवी मुंबईतील कोविड टेस्टिंग सेंटरमधील घोटाळाप्रकरणी नवी मुंंबई महानगरपालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी पालिकेतील कोव्हिड टेस्टिंग चे इनचार्ज डॉ सचिन नेमाने यांना निलंबित केले आहे. त्याचप्रमाणे त्रिसदस्यीन समिती देखील स्थापन करण्यात आली आहे.
हेही वाचा - आमची राष्ट्रपती राजवट लावण्याची मागणी नाही पण... ! देवेंद्र फडणवीसांची मुख्यमंत्र्यांवर टीका
विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी गुरुवारी नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त अभिजित बांगर यांनी कोव्हिड टेस्टिग मध्ये घोटळया झाल्यांची बाब निर्दशनास आणून देत याप्रकरणात कारवाई करण्याची मागणी केली होती. त्यानंतर डॉ. योगेश कडूसकर यांच्या अध्यक्षतेखाली त्रिसदस्यीय समिती नेमण्यात आली होती. या समितीने चौकशीअंती मनपाचे आरोग्य अधिकारी आणि टेस्टिंग इनचार्ज डॉ. सचिन नेमाने यांना निलंबित केले. तसेच दोन आठवड्यात याप्रकरणाची संपूर्ण चौकशी करुन दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल, असेही पालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
काय आहे घोटाळा
राज्यातील कोरोना उपचार केंद्रातील विदारक परिस्थितीची अनेक उदाहरणे गेल्या काही दिवसांत समोर आली आहेत. यामध्ये आता कोविड टेस्टिंगमधील घोटाळ्याची भर पडली आहे. नवी मुंबईच्या कोविड टेस्टिंग सेंटरमध्ये हा सर्व प्रकार घडला आहे. याठिकाणी 10 वर्षांपूर्वी मृत्यू झालेल्या व्यक्तीचा अहवाल देऊन शासनाकडून पैसे लाटण्यात आल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला होता. अधिक चौकशी केली असता या कोव्हिड टेस्टिंग सेंटरमध्ये गावाला गेलेल्या आणि मृत लोकांचे अहवाल दाखवून शासनाकडून पैसे लाटल्याचे स्पष्ट झाले आहे. या माध्यमातून कॉन्टॅक्ट ट्रेसिंगची आकडेवारी फुगवून दाखविली जात असल्याचा आरोप आहे.
Commissioners action in Navi Mumbai covid testing scam Covid testing in charge suspended
----------------------------------------------------
( संपादन - तुषार सोनवणे )
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.