मुंबई

तक्रारींचे निवारण अंतिम टप्प्यात, प्रशासन म्हणतय वीजबील भरून सहकार्य करा; तुम्ही बिलं भरणार का ?

तेजस वाघमारे

मुंबई, ता. 14 : लॉकडाऊनच्या कालावधीत वीज ग्राहकांना सरासरी वीज बिले पाठवण्यात आल्याने अनेकांना हजारो रुपयांची बिले आली. याबाबत वीज ग्राहकांनी महावितरणकडे केलेल्या बहुतांश तक्रारींचे निवारण झाले आहे. उर्वरित तक्रारी सोडविण्याचे काम अंतिम टप्प्यात असून नागरिकांनी बिले भरून महावितरणला अखंडित वीज पुरवठा करण्यासाठी सहकार्य करावे करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

कोरोना विषाणूचा प्रार्दूभाव रोखण्यासाठी मार्च 2020 रोजी देशात लॉकडाऊन घोषित करण्यात आला. कोरोनाचा प्रार्दुर्भाव असताना देखील महावितरणने ग्राहकांना अखंडित व नियमित वीज पुवठा करून ग्राहकांना घरात राहणे सुसह्य केले. एप्रिल 2020 ते जानेवारी 2021 या दहा महिन्याच्या काळात थकीत वीजबिलापोटी कोणत्याही ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित केला नाही. 

राज्यातील 41 लाख 7 हजार घरगुती ग्राहकांसह विविध वर्गवारीतील 80 लाख 32 हजार ग्राहकांनी एप्रिल 20 ते जानेवारी 2021 या दहा महिन्यांच्या काळात एकही वीज बिल भरले नाही. त्यामुळे थकबाकीमध्ये करोडो रूपयांची भर पडली असून महावितरणला प्रचंड मोठया आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे.

ग्राहकांना अविरत वीजपुरवठा करण्यासाठी दरमहिन्याला वीज खरेदी करावी लागत असून विजेच्या पारेषणवरही मोठा खर्च करावा लागत आहे. ग्राहकांनी थकीत रक्कम न भरल्याने महावितरणला ग्राहकांना अखंडित वीजपुरवठा करण्यासाठी मोठ्या अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे.

वीजबिलांच्या एकूण 9 लाख 80 हजार 499 पैकी 9 लाख 33 हजार 324 तक्रारीचे निवारण महावितरणने केले आहे. उर्वरित तक्रारींचे निवारण करण्याची प्रक्रिया देखील अंतिम टप्प्यात आहे. महावितरणची आर्थिक परिस्थिती लक्षात घेवून ग्राहकांनी  आपल्या वीजबिलांचा भरणा करण्याचे आवाहन महावितरणकडून करण्यात येत आहे.

complaint resolving in last phase mahavitaran is asking energy customers to pay electricity bills

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nilesh Rane : आमदार होताच निलेश राणेंची धमकी, म्हणाले, ...तर त्याचा जागेवरच बंदोबस्त करु

Pune Fake Voting: पुणे शहरातील सर्व ८ मतदारसंघांत फेक मतदान! कोथरुड अन् वडगावशेरीत सर्वाधिक

Ladki Bahin Yojana: आनंदाची बातमी, या तारखे पासून लाडक्या बहिणींना मिळणार 2100 रुपये, मोठी अपडेट आली समोर!

Mumbai Fire: रात्रीच्या वेळी मुंबईजवळ भीषण आग; ६ बस जाळून खाक, वाचा नक्की काय घडलं

IPL Mega Auction 2025: Mumbai Indians ने पायावर धोंडा मारून घेतला; 32.5 cr खिशात असूनही चांगला खेळाडू जाऊ दिला

SCROLL FOR NEXT