मुंबईः सध्या राज्यात कोरोनाचं सावट आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा वाढताना दिसतोय. प्रशासनाकडून कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी विविध पातळीवर प्रयत्न केले जात आहेत. कोरोना रुग्णांना योग्य उपचार मिळावे यासाठी प्रशासनानं प्रयत्न करताना दिसताहेत. राज्य सरकारनं कोरोनाच्या उपचारासाठी पालिकेसह खासगी रुग्णालयासाठी खास कार्यप्रणाली आखली आहे. चाचणी, रुग्णालयातील उपचार याची रक्कम राज्य शासनाकडून निश्चित करण्यात आली असतानाही आतापर्यंत खासगी रुग्णालयाकडून अव्वाच्या सव्वा बिलं आकारल्या घटना समोर आल्या आहेत. आता अशातच नोटीस बजावूनही न ऐकणाऱ्या रुग्णालयांवर पालिकेनं कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.
मुंबई, ठाणे पालिकेनंतर मिरा भाईदर पालिकेनं रुग्णांकडून अवास्तव बील वसूल करणाऱ्या रुग्णालयावर कारवाईचा बडगा उगारण्यास सुरुवात केलीय. मिरा भाईंदर महापालिकेने गॅलेक्सी रुग्णालयाला दणका दिला आहे. कोरोनाबाधित रुग्णांकडून जास्त बिल आकारणी केल्याच्या तक्रारींची दखल पालिकेनं घेतली आहे.
मिरा रोड येथील गॅलेक्सी रुग्णालयाची कोविड म्हणून दिलेली मान्यता मिरा भाईंदर महापालिका प्रशासनाने रद्द केलीय. तसंच कोरोनाबाधित रुग्णांकडून ज्यादा आकारणी केलेली रक्कम या खाजगी रुग्णालयाकडून वसूल करण्याचे आदेशही पालिकेनं दिलेत.
शनिवारी ठाणे महापालिकेनं शनिवारी घोडबंदर भागातील होरायझन प्राइम या खासगी रुग्णालयाची नोंदणी रद्द केली आहे. प्रशासनानं कारवाई करता एक महिन्यांसाठी या रुग्णालयाची मान्यता रद्द केली.
मिरा भाईंदर महापालिका हद्दीतील खाजगी हॉस्पिटल कोविड-19 अंतर्गत शासनानं दिलेल्या निर्देशानुसार ८० टक्के बेड राखीव ठेवणे आणि शासनाने दिलेल्या दरानुसार कोविड रुग्णांकडून बिल आकारणं आवश्यक आहे. मात्र शासनाच्या आदेशाचे पालन न करता अवाजवी बिलं आकारत असल्याबाबत तक्रारी गॅलेक्सी रुग्णालयाविरुद्ध प्राप्त झाल्या होत्या.
महापालिका प्रशासनानं खाजगी रुग्णालयांना नोटीसही बजावली. या नोटीसमध्ये रुग्णालयाला शासनाच्या मार्गदर्शक सूचनेप्रमाणे कामकाज न केल्याबद्दल खुलासा देण्यास सांगितलं होतं. मात्र गॅलेक्सी रुग्णालयानं याबाबत कोणतंही स्पष्टीकरण दिलं नाही. तसंच लेखापरीक्षणाअंती ज्यादा आकारणी केलेल्या रकमा संबंधित रुग्णांना परत केल्याचे कोणतेही पुरावे सादर केलेले नाही. त्यामुळे मिरा भाईंदर महापालिकेचे आयुक्त डॉ. विजय राठोड यांनी रुग्णालयाची कोविड मान्यता रद्द केली. रुग्णांकडून ज्यादा आकारणी केलेली रक्कम वसूल करण्याचे आदेशही दिलेत.
Complaint unreasonable bills cancellation hospital covid recognition Mira Road
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.