Computer based siren system on Samruddhi Mahamarg to prevent accidents mumbai esakal
मुंबई

Accident News : अपघात रोखण्यासाठी समृद्धी महामार्गावर संगणक आधारीत सायरन प्रणाली

चार इंटरचेंजेस तयार करून चालकांचे केले जाते समुपदेशन; समृद्धीच्या दोन्ही टोकावर वाहनांच्या टायरची तपासणी

प्रशांत कांबळे

मुंबई : समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणे वाहन चालवून होणारे अपघात महामार्ग पोलीसांची डोकेदूखी ठरली आहे. वाहन चालकांकडून वाहतुक नियमांची सर्रास पायमल्ली होत असून, वाहनांचे सदोष टायर वापरल्याने सुद्धा समृद्धी महामार्गांवर अपघात होत असल्याचे लक्षात आले आहे.

त्यामूळे परिवहन आयुक्त विवेक भिमनवार यांनी पुढाकार घेत शिर्डी, औरंगाबाद, कारंजा आणि नागपुर या चार इंटरचेंजेंस तयार करून संगणक आधारीत सायरन प्रणाली कार्यान्वीत केली आहे. तर नागपुर ते शिर्डी यादरम्यान 7 पथकांची नियुक्ती करून 24 तास चालकांचे समुपदेशन करण्याच्या सुचना दिल्या आहे.

समृद्धी महामार्गावर ताशी 120 वेगाची मर्यादा आहे. वाहनांची समृद्धी महामार्गावरील एंट्री आणि एक्झीटवर तपासनी केली जाणार असून, त्यादरम्यान वाहनाची एव्हरेज स्पीड तसापली जाणार आहे. एव्हरेज स्पीड पेक्षा जास्त आढळून आल्यास, एक्झीट टोल नाक्यावर आॅटोमॅटीक सायरन वाजणार असून, वाहतुक नियमांची पायमल्ली करणाऱ्या अशा वाहन चालकांचे त्याच ठिकाणी थांबवून समुपदेशन केले जाणार आहे.

त्याशिवाय ओव्हरस्पीड, लेनकटींग, नो पार्किंग, रिफलेक्टर संदर्भातील नियम भंग करणाऱ्या वाहनांचे त्याचवेळी आॅऩलाईन पद्धतीने वाहन क्रमांक ब्लाॅक केल्या जाणार असून असे वाहन टोल नाके ओलांडतांना त्यांना थांबवून सुमारे 15 मिनीट चालकांचे समुपदेशन केले जाणार आहे.

संगणक प्रणाली 17 एप्रिल पासून समृद्धी महामार्गावर कार्यान्वीत झाली असून, दोन दिवसात 294 वाहनांची तपासणी करण्यात आली आहे. त्यामध्ये एंन्ट्री पाँईंन्टवर वाहनांच्या टायरची तपासणी केल्यानंतर दोन दिवसात 16 वाहनांना समृद्धी महामार्गावर प्रवेश नाकारण्यात आला आहे.

रिफलेक्टर नसलेल्या 30 वाहनांना आरटीओ पथकांच्या मार्फेत रिफलेक्टर लावण्यात आले आहे. 38 वाहनांची वेग मर्यादा ताशी 120 पेक्षा जास्त आढळून आली आहे. त्याचप्रमाणे ओव्हरस्पीड 3 वाहन, लेनकटींग 8 वाहन दोषी आढळून आले असल्याची माहिती परिवहन विभागाने दिली आहे.

समृद्धी मार्गावरील अपघाताची आकडेवारी (11 डिसेंबर ते 31 मार्च )

महामार्ग पोलीस क्षेत्र - मृत्यु - अपघात

  • खुर्सापुर - 0 - 6

  • जाम - 1 - 27

  • धामनगांव रेल्वे - 4 - 28

  • आमनी - 3 - 45

  • मलकापुर - 11 - 42

  • औरंगाबाद - 5 - 48

  • जालना - 2 - 50

  • भाबलेश्वर - 2 - 7

  • एकूण - 28 - 253

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT