Kalyan Loksabha  sakal
मुंबई

Kalyan Loksabha : अंबरनाथमधील काँग्रेसचे नगरसेवक शिवसेना शिंदे गटाच्या वाटेवर ; कल्याण लोकसभा मतदारसंघात हाताच्या पंजाला धक्का बसणार ?

कल्याण लोकसभा मतदारसंघात म्हाविकास आघाडीला मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अंबरनाथ येथील काँग्रेसचे 7 ते 8 नगरसेवक शिवसेना शिंदे गटाच्या वाटेवर असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत लवकरच या नगरसेवकांचा पक्ष प्रवेश होणार असल्याची सूत्रांची खात्रीलायक माहिती आहे.

शर्मिला वाळुंज : सकाळ वृत्तसेवा

डोंबिवली : कल्याण लोकसभा मतदारसंघात म्हाविकास आघाडीला मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अंबरनाथ येथील काँग्रेसचे 7 ते 8 नगरसेवक शिवसेना शिंदे गटाच्या वाटेवर असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत लवकरच या नगरसेवकांचा पक्ष प्रवेश होणार असल्याची सूत्रांची खात्रीलायक माहिती आहे. यामध्ये अंबरनाथ शहर ब्लॉक काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष यांचे नाव आघाडीवर असल्याचे बोलले जात आहे.

कल्याण भिवंडी लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीतील पक्षात धुसफूस मोठ्या प्रमाणात सुरू आहे. भिवंडी मतदारसंघात काँग्रेसला जागा न मिळाल्याने नाराज असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारास असहकार्याच्या भूमिकेत आहे. तर कल्याण लोकसभा मतदारसंघात देखील महाविकास आघाडीतील पदाधिकारी, कार्यकर्ते नाराज असल्याचे बोलले जात आहे. या नाराजीचा फायदा विरोधी पक्ष उचलत असून मोठ्या प्रमाणात पक्ष प्रवेश केले जात आहेत. शिवसेना शिंदे गटात सध्या मोठ्या प्रमाणात इतर पक्षीय पदाधिकाऱ्यांचे इन कमिंग सुरू आहे.

अंबरनाथ येथील काँग्रेसचे 7 ते 8 नगरसेवक लवकरच शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. कल्याण लोकसभा मतदारसंघ शिवसेना बालेकिल्ला आहे. या मतदारसंघात शिवसेनेचे दोन्ही गट एकमेकांसमोर निवडणुकीसाठी उभे आहेत. मुख्यमंत्री शिंदे यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे हे स्वतः तिसऱ्यांदा निवडणुकीसाठी उभे असून ठाकरे गटाच्या उमेदवार वैशाली दरेकर त्याच्या समोर निवडणूक लढवत आहॆत.

त्यामुळे या निवडणुकीकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. त्यातच शिंदे यांनी अंबरनाथ मधील 7 ते 8 काँग्रेसच्या माजी नगरसेवकांना आपल्या गळाला लावले आहॆ. पक्ष प्रवेशात अंबरनाथ पालिकेचे माजी विरोधीपक्ष नेते आणि काँग्रेसचे अंबरनाथ शहर ब्लॉक काँग्रेस कमिटी अध्यक्ष यांचे नाव अग्रेसर असल्याची चर्चा आहे. त्यांच्यासोबत अजून 8 नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्ते शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची सूत्रांची माहिती आहॆ.

याबाबत कमालाची गुप्तता पाळली जात असली तरी, दबक्या आवजात लवकरच यांचा प्रवेश होणार असल्याचे बोलले जात आहे. यामुळे शिवसेनेची कल्याण लोकसभेतील ताकद वाढणार आहे. तर म्हाविकास आघाडीला मोठा फटका पडणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dhananjay Mahadik : 'या मुन्नाचा भांगसुद्धा कोणी वाकडा करू शकत नाही'; खासदार महाडिकांचा उद्धव ठाकरेंना सणसणीत टोला

Latest Maharashtra News Updates : राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार नवाब मलिक आणि सना मलिक यांच्या बाईक रॅलीला सुरूवात

मृणाल दुसानिस झाली बिसनेसवूमन! ठाण्यात 'या' ठिकाणी सुरू केलं नवं हॉटेल; पाहा आतून कसं आहे अभिनेत्रीचं 'बेली लाफ्स'

सावधान! व्हॉट्सॲपवर लग्नाची आमंत्रण पत्रिका येताच क्लिक करू नका, नाहीतर होईल मोठी फसवणूक, वाचा 'या' नव्या स्कॅमबद्दल

जीगर लागतो...! खांद्याला दुखापत, तरीही ऑस्ट्रेलियन खेळाडूने संघासाठी एका हाताने केली फलंदाजी

SCROLL FOR NEXT