उद्योग हे आधुनिकतेचं प्रतीक असल्यानं योगींनी थोडी आधुनिकता अंगीकारली पाहिजे, असंही दलवाई म्हणाले.
मुंबई : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर (Yogi Adityanath Visit Mumbai) आहेत. पुढील महिन्यात लखनौ इथं होणाऱ्या ग्लोबल इन्व्हेस्टर्स समिटसाठी (GIS) देशातील बड्या उद्योगपतींना आमंत्रित करण्यासाठी योगी मुंबईत आलेत.
योगींच्या दौऱ्यादरम्यान काँग्रेस नेते आणि माजी खासदार हुसेन दलवाई (Congress leader Hussain Dalwai) यांनी वादग्रस्त विधान केलंय. दलवाईंनी योगींच्या भगव्या कपड्यांवर भाष्य केलंय. CM योगींनी भगव्या कपड्यांऐवजी आधुनिक कपडे घालावेत, असं दलवाईंनी म्हटलंय. धर्माबद्दल दररोज बोलत जाऊ नका, भगवे कपडे घालू नका आणि थोडं आता आधुनिक व्हा, असा सल्ला दलवाईंनी योगींना दिलाय.
काँग्रेस नेते पुढं म्हणाले, योगींनी महाराष्ट्रातून उद्योग घेण्याऐवजी आपल्या राज्यात नवीन उद्योग विकसित करावेत. महाराष्ट्रानं उद्योगांसाठी चांगल्या सुविधा दिल्या आहेत, त्यामुळं महाराष्ट्रातून उद्योग घेण्याऐवजी राज्यात नवीन उद्योग विकसित करा. उद्योग हे आधुनिकतेचं प्रतीक असल्यानं योगींनी थोडी आधुनिकता अंगीकारली पाहिजे, असंही दलवाई म्हणाले.
दि. 10 ते 12 फेब्रुवारी दरम्यान लखनौ इथं ग्लोबल इन्व्हेस्टर्स समिटचं (Global Investors Summit) आयोजन करण्यात आलं आहे. यावेळी यूपी सरकार देशातील मोठ्या औद्योगिक घराण्यांसह परदेशी गुंतवणूकदारांना आमंत्रित करत आहे. यापूर्वी योगी आदित्यनाथ यांनी 2018 मध्ये इन्व्हेस्टर्स समिटपूर्वी मुंबईत रोड शो केला होता.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.