Congress marches on Raj Bhavan Opposition to ED action rahul gandhi nana patole mumbai  sakal
मुंबई

‘ईडी’ कारवाईला विरोध; काँग्रेसचा राजभवनावर मोर्चा

नेत्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : ‘‘केंद्रातील भाजप सरकार काँग्रेस नेतृत्वाला सरकारी यंत्रणांच्या माध्यमातून घाबरवण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु अशा दबावाला अथवा दहशतीला आम्ही भीक घालत नाही. देशातील जनतेचे प्रश्न हाती घेत मोदी सरकारला सातत्याने कोंडीत पकडणारे राहुल गांधी हे देशाचा आवाज बनले आहेत. त्यांच्यावरील सूडबुद्धीच्या कारवाईमुळे काँग्रेसचा कार्यकर्ता पेटून उठला आहे. ही कारवाई आम्ही सहन करणार नाही. केंद्र सरकारविरोधात आमचा संघर्ष सुरुच राहील,’’असा इशारा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी गुरुवारी दिला.

केंद्र सरकारने राहुल गांधी यांच्याविरोधात सुरु केलेल्या ‘ईडी’ चौकशीविरोधात पटोले यांच्या नेतृत्वाखाली आज राजभवनवर मोर्चा काढण्यात आला. मलबार हिल वरील हँगिग गार्डनपासून निघालेला मोर्चा पोलिसांनी राजभवनजवळ अडवला व नंतर पोलिसांनी मंत्र्यांसह काँग्रेस पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेऊन आझाद मैदान पोलिस स्थानकात नेण्यात आले. मोर्चात विधिमंडळ पक्षनेते व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत, मत्स्यसंवर्धन मंत्री अस्लम शेख, महिला व बालकल्यणा मंत्री यशोमती ठाकूर, शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख, कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

पटोले म्हणाले की, राजकीय द्वेषातून भाजप सरकार करत असलेल्या कारवाई विरोधात काँग्रेस रस्त्यावर उतरलेली असताना पोलिस बळाचा वापर करून मंत्री, खासदार आमदार, महिला कार्यकर्ते यांना मारहाण केली जात आहे.देशात आज अराजकता निर्माण केली आहे. याविरोधातील असंतोष व्यक्त केला जात आहे. केंद्र सरकारच्या विरोधातील आमचा हा संघर्ष सुरुच राहील.

काँग्रेसच्या विनंतीनुसारच भेट रद्द

मुंबई : काँग्रेस पक्षाच्या विनंतीनुसार राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, नाना पटोले, एच. के. पाटील आदींच्या नेतृत्वाखालील एका शिष्टमंडळाला गुरुवारी सायंकाळी साडेचार वाजता राजभवन येथे भेटीची वेळ दिली होती. परंतु थोरात यांच्या कार्यालयाकडून आलेल्या नव्या विनंतीनुसारच ही भेट रद्द करण्यात आली. शिष्टमंडळाची भेट राजभवनाकडून रद्द केली नसल्याचा खुलासा करण्यात आला आहे. या संदर्भात काही नेत्यांनी राज्यपाल मुंबईत उपलब्ध नसल्याबाबत केलेले वक्तव्य चुकीचे असल्याचे राजभवनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

सोनिया व राहुल गांधी यांना नोटिसा पाठवून नाहक त्रास दिला जात आहे. चौकशीच्या नावाखाली राहुल गांधी यांचा तीन दिवस छळ केला जात आहे. काँग्रेसचा कार्यकर्ता केंद्र सरकारची हा दडपशाही सहन करणारा नाही. या मोर्चाच्या माध्यमातून हा असंतोष मोदी सरकारपर्यंत पोहचवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

- बाळासाहेब थोरात, महसूल मंत्री

खोट्या प्रकरणात अडकवून आमच्या नेतृत्वाला दाबण्याचा केला जात आहे. परंतु आम्ही ते सहन करणार नाही. आम्ही आमच्या तीव्र भावना या मोर्चाच्या माध्यमातून व्यक्त केल्या आहे. राज्यपाल महोदयांनी आमच्या या भावना केंद्र सरकारपर्यंत पोहचवाव्या.

- अशोक चव्हाण, सार्वजनिक बांधकाम मंत्री

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dolly Chaiwala: डॉली चायवाला भाजपचा स्टार प्रचारक! नागपूरमध्ये केला महायुतीसाठी प्रचार

SA vs IND: 23 Six, 17 Fours! जोहान्सबर्गच्या मैदानात सॅमसन-तिलकचं वादळ; भारताचं द. आफ्रिकेला तब्बल 284 धावांचं लक्ष्य

SA vs IND: संजू सॅमसनने तिसऱ्या शतकासह रचला इतिहास! तिलक वर्मानेही ठोकली सलग दुसरी Century

Assembly Elections: २४ ते ३० मतदारसंघ महत्त्वाचे! दोन्ही आघाड्यांना बंडाचा फटका बसणार,'शांती' यज्ञासाठी पळापळ सुरू

Dhruv Rathee: ध्रुव राठीचं चॅलेंज आदित्य ठाकरेंनी स्वीकारलं! ‘मिशन स्वराज’साठी शेअर केली मुद्द्यांची यादी

SCROLL FOR NEXT