मुंबई : आता मुंबई महानगरपालिका निवडणूकीचे वेध लागले असून त्याच्या तयारीला सुरुवात झाली आहे. या पार्श्वभूमिवर राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे. यादरम्यान मुंबई महानगरपालिकेची प्रभाग रचना ही शिवसेनेने स्वतःच्या फायद्यासाठी केली, असा आरोप कॉंग्रेसचे नेते मिलींद देवरा यांनी केला आहे. यानंतर आगामी मुंबई महापालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमिवर महाविकास आघाडीतील (MVA) दोन पक्षांमधील वाद पुन्हा नव्याने समोर आला आहे. (congress Milind Deora said Shiv Sena has formed new wards in Mumbai for its own benefit)
एका वृत्तवाहिनीशी बोलताना मिलींद देवरा यांनी कॉंग्रेसचा विरोध असताना देखील शिवसेनेने नवीन प्रभागरचनेचा विषय रेटून नेला असे म्हणाले आहेत. देवरा यांनी पुढे बोलताना सांगितले की, केवळ एका पक्षाच्या फायद्यासाठी मुंबईच्या वार्डामध्ये फेरफार करणे हे अनैतीक तसेच घटनेच्या विरोधात आहे, यासाठी नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिल्याचे मिलींद देवरा म्हणाले. मी सर्व पक्षांना विनंती करतो की, त्यांनी एकत्र येऊन सर्व वॉर्डसाठी नवीन सीमा, नवीन डिलीमिटेशन, परिसीमा आणि नव्या आरक्षणाची मागणी करावी असेही ते म्हणाले.
शिवसेनेने जेव्हा हे सुरु केलं तेव्हा महाविकास आघाडीचं सरकार होतं, तेव्हा बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, नाना पटोले भाई जगताप तसेच महानगरपालिकेतील विरोधी पक्षनेते रवी राजा या सर्व कॉंग्रेस नेत्यांनी याला आक्षेप केला होता, तरी देखील शिवसेनेने विषय पुढे नेला. म्हणून आज कॉंग्रेसचे नगरसेवक कोर्टात गेले आणि मी पत्र लिहीलं असं मिलींद देवरा म्हणाले आहेत.
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी राजकीय वातावरण तापताना दिसत आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी स्वतः सूत्र हातात घेतली असून, त्यांनी कोणता पक्ष सोबत येईल नाही येईल याचा विचार न करता कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आदेश दिले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.