काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची देवेंद्र फडणवीस आणि भाजपवर सडकून टीका
नवी मुंबई: येथील काँग्रेस पक्षाच्या (Congress) नुतनीकरण केलेल्या कार्यालयाचे उद्घाटन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांच्या हस्ते झाले. यावेळी राज्याचे मत्स्यव्यवसाय मंत्री अस्लम शेख (Aslam Shaikh) हेदेखील पटोला यांच्यासमवेत उपस्थित होते. कोरोना संकटामुळे अडचणीत आलेल्या गरजू कोळी आणि मच्छीमार (Fishermen) बांधवांना अन्नधान्याचे वाटप करण्याचा कार्यक्रम यावेळी काँग्रेस पक्षाकडून पार पाडण्यात आला. नवी मुंबईतील (Navi Mumbai) काँग्रेस भवनच्या उद्घाटनप्रसंगी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी OBC आरक्षणाच्या (OBC Reservation) मुद्द्यावरून भाजपवर सडकून टीका केली. 'राज्य सरकारने OBC आरक्षण टिकवलं नाही. कोर्टात सरकारने बाजून नीट मांडली नाही. योग्य पद्धतीने अभ्यास करून राज्य सरकार कोर्टात गेलं नसल्याने हे आरक्षण रद्द करण्याची नामुष्की ओढवली', अशी टीका गेल्या काही दिवसांपासून भाजपकडून (BJP) महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारवर केली जात आहे. या टीकेचा पटोले यांनी चांगलाच समाचार घेतला. (Congress Nana Patole slams criticizes BJP Devendra Fadnavis over OBC Reservation)
"ओबीसी समाजाचा घात हा खरं पाहता भाजपने केला आहे. ओबीसी समाजाला शैक्षणिक, राजकीय आणि रोजगार क्षेत्रात बरबाद करण्याचे कामही भाजपनेच केले आहे. माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी घटनेची पायमल्ली केली. नियमांना धरून प्रत्येक गोष्ट केली असती तर आज ओबीसी समाजावर अशा प्रकारची वेळ आली नसती. भाजपच्या त्यावेळच्या धोरणांमुळे ओबीसी समाजावर ही वेळ आली आहे. देवेंद्र फडणवीस हे ओबीसी समाजाची दिशाभूल करत आहेत", अशा शब्दात त्यांनी नाना पटोले यांनी भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली.
"काँग्रेस पक्ष आणि महाविकास आघाडी ओबीसी समाजाच्या सोबत आहे. निवडणुकांमधील आरक्षणाचा संभ्रम सध्या दिसतोय पण त्यावर लवकरच सरकार तोडगा काढेल. लॉकडाऊन संपताच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका तात्काळ घ्याव्या अशी काँग्रेसची आग्रही भूमिका असेल", अशी माहितीही त्यांनी दिली.
दरम्यान, याच मुद्द्यावर राज्याचे मंत्री विजय वडेट्टीवार यांनीही आपली भूमिका व्यक्त केली. "सर्वोच्च न्यायालयाने OBC आरक्षणाची याचिका फेटाळली आहे. पण कोर्टाने आरक्षण पूर्णपणे नाकारलेलं नाही. त्यामुळे जोवर हा आरक्षणाचा तिढा सुटत नाही, तोपर्यंत कोणतीही निवडणूक घेऊ नये. कोर्टाच्या निर्णयानंतर माझी अनेकांशी चर्चा झाली. मला अनेक नेते, सर्व पक्षातील कार्यकर्ते यांनी फोन केले आणि त्यांची भूमिका मांडली. कोणत्याही निवडणुका जोवर OBC आरक्षणावर निर्णय होत नाही, तोवर होऊ नयेत असे त्यापैकी अनेकांनी मला सांगितले. आणि मी जरी राज्याचा मंत्री असलो तरीही आमचीपण हीच भूमिका आहे", असे वडेट्टीवार यांनी स्पष्ट केलं.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.