मुंबई

'प्रताप सरनाईक यांचा मानसिक छळ होतोय'

सरनाईक यांच्या लेटर बॉम्बने राज्याच्या राजकारणात खळबळ

दीनानाथ परब

मुंबई: शिवसेना आमदार प्रताप सरनाईक (pratap sarnaik) यांच्या पत्राने राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. सत्तेत असलेले राष्ट्रवादी (ncp) आणि काँग्रेस (congress) हे दोन पक्ष आपलेच कार्यकर्ते फोडत आहेत आणि आपला पक्ष कमकुवत होत चालला आहे. अशा परिस्थितीत पंतप्रधान मोदींशी जुळवून घेतलेले बरं होईल, असं पत्रात सरनाईक यांनी लिहिलं आहे. (congress sachin sawant allege shivsena mla pratap sarnaik harassing by bjp)

प्रताप सरनाईक यांचं पत्र समोर आल्यापासून महाविकास आघाडी सरकारचे नेते भाजपाला लक्ष्य करत आहेत. कारण पत्रात एक मुद्दा असाही आहे की, शिवसेनेच्या काही लोकांना कोणताही गुन्हा किंवा चूक नसताना केंद्रीय तपास यंत्रणांकडून नाहक त्रास सुरु आहे. मोदींशी जुळवून घेतल्यास आम्हाला व आमच्या कुटुंबीयांना होणारा नाहक त्रास तरी थांबेल अशी अनेक कार्यकर्त्यांची भावना आहे, असेही पत्रात नमूद केले आहे.

तोच मुद्दा पकडून काँग्रेसचे सरचिटणीस आणि प्रवक्ते सचिन सावंत यांनी भाजपावर निशाणा साधला आहे. "आमदार प्रताप सरनाईकांबद्दल आम्हाला सहानुभूती आहे. त्यांच्या पत्रातून त्यांचा मानसिक छळ होत आहे हे लक्षात येते. मोदी सरकार तपास यंत्रणांचा खुलेआम वापर करून मविआ सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न करत आहे. येनकेन प्रकारे सत्ता हस्तगत करण्यासाठी भाजपा अत्यंत खालच्या पातळीवर उतरली आहे" अशी टीका सचिन सावंत यांनी टि्वटमधून केली आहे.

संजय राऊत काय म्हणाले?

"प्रताप सरनाईक यांनी जर पत्रातून काही मत मांडलं असेल तर त्यात प्रतिक्रिया देण्यासारखं काहीच नाही. त्यांच्या पत्रात एक महत्त्वाचं वाक्य आहे की शिवसेनेच्या काही नेतेमंडळींना विनाकारण त्रास दिला जातोय. कोण, कोणाला आणि का विनाकारण त्रास देत आहे हा या पत्रामधला महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यासंदर्भात आमचा अभ्यास सुरू आहे", अशा शब्दात संजय राऊत यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: घाटकोपर पूर्व विधानसभा मतदार संघात कोणी घेतली आघाडी ? भाजप विरुद्ध शरद पवार गटात थेट लढत

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: मावळमध्ये सुनील शेळके यांची दणदणीत आघाडी

Maharashtra Assembly Election Result : महायुती सत्तास्थापनेजवळ; महाविकास आघाडीचीही कडवी झुंज

नुकतीच पार पडलेली ब्राइड टू बी पार्टी; आता बॅचलर पार्टीसाठी थायलंडला पोहोचली मराठी अभिनेत्री; पाहा झक्कास फोटो

Winter Diet: आहारात 'या' 5 पदार्थांचा करा समावेश, हिवाळ्यात राहाल निरोगी

SCROLL FOR NEXT