Pm-Modi-Petrol-Diesel-Hike 
मुंबई

"मोदींनी पेट्रोल डिझेलवरील अन्याय दूर केला"; काँग्रेसचा टोला

इंधन दरवाढीवरून काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी उपस्थित केले प्रश्न

विराज भागवत

इंधन दरवाढीवरून काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी उपस्थित केले प्रश्न

मुंबई: गेल्या दोन महिन्यांपासून सातत्याने वाढत असलेल्या इंधनाच्या (Petrol Diesel Fuel Prices) दराने सोमवारी राज्यभरात उच्चांक गाठला. राज्यातील अनेक बड्या शहरात पेट्रोलचे दर शंभरीपार गेले. सातत्याने वाढणाऱ्या इंधन दरांवर सामान्य नागरिकांमधून नाराजी व्यक्त होताना दिसत आहे. सर् प्रकारच्या इंधनाचे दर सध्या प्रचंड वाढल्याचे दिसत आहेत. या मुद्द्यावर काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी आपले मत व्यक्त केले. (Congress Sachin Sawant Criticizes BJP PM Modi Govt for Petrol Diesel Fuel Price Hike)

"मोदी सरकारची ७ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल जनतेला भेट - महाराष्ट्रात जवळपास ३० जिल्ह्यात पेट्रोलने शंभरी पार केली. ७० वर्षात पेट्रोल डिझेलवर प्रचंड अन्याय झाला होता. मोदींनी पेट्रोल डिझेलवरचा अन्याय दूर केला आहे. मोदी सरकार जनतेला संकट काळात मदत करण्याऐवजी सूड उगवत आहे. काँग्रेस ने २०१४ ला सत्ता सोडली, त्यावेळी क्रूड ऑइल १०८ डॉलर होते. पेट्रोल जवळपास ७० रूपये होते. आज क्रूड ऑइल जवळपास ६७ डॉलर आहे पण पेट्रोल १०० पार गेले आहे. गेले ७ वर्षे पेट्रोल डिझेल वर एक्साईज ड्युटी लावून २० ते २५ लाख कोटी काढले. गेले कुठे? मोदी सरकारचे कर्तृत्व यातून दिसते", अशा शब्दात सचिन सावंत यांनी मोदी सरकारवर जोरदार टीका केली.

दरम्यान, राज्यभरातील आतापर्यंतची ही सर्वात मोठी इंधन दरवाढ असल्याचे इंधन कंपन्यांकडून सांगितले जात आहे. देशातील पाच राज्यांच्या निवडणुका संपताच देशभरात इंधन दरवाढ सुरू झाली. गेल्या दोन महिन्यांपासून सातत्याने दरवाढ होत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत इंधन स्वस्त झाले असले तरी, राज्य आणि केंद्र सरकारच्या विविध करांमुळे देशातील इंधनाच्या दरात सातत्याने वाढ होत चालली आहे. रायगड आणि ठाणे वगळता राज्यातील एकूण ३४ जिल्ह्यांमध्ये पेट्रोलच्या दराचा भडका उडाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT