मुंबई : वीज वितरण कंपन्यांनी स्मार्ट मीटरचा (Smart meter) वापर वाढवल्यास ग्राहक सेवेचा दर्जा वाढणार आहे. त्यामुळे ग्राहकांच्या वेळेत रिडींग घेता येईल व त्यांना योग्य वीजबिल (electric bill) मिळेल. त्यामुळे तक्रारींना वाव राहणार नाही, असे प्रतिपादन महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल (Vijay singhal) यांनी केले. कॉन्फिड्रेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री (CII) यांच्यामार्फत आयोजित स्मार्ट मीटर या विषयावर आयोजित ऑनलाईन परिषदेत (online conference) सिंघल बोलत होते. पूर्ण देशभरात 'स्मार्ट मीटर नॅशनल प्रोग्राम' अंतर्गत २०२३ पर्यंत २५ कोटी पारंपरिक मीटर बदलून त्याजागी स्मार्ट मीटर लावण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सीआयआयने या परिषदेचे आयोजन केले होते.
यावेळी सिंघल म्हणाले, नेमका वीज वापर लक्षात आल्याने ग्राहक वीज बचत करण्याबाबत अधिक जागरूक राहू शकतो. स्मार्ट मीटरमुळे वीज देयक व्यवस्थेत आमूलाग्र बदल होणार आहेत. बिलांबाबत ग्राहकांच्या तक्रारी कमी झाल्यास त्याचा फायदा ग्राहकांसोबतच वीज वितरण कंपन्यांनाही होणार आहे. ग्राहकांना वेळेत बिल भरण्याची सवय लागून वीज कंपन्यांची थकबाकी कमी होण्यासाठीही स्मार्ट मीटरची मदत होणार आहे.
त्यामुळे स्मार्ट मीटरसाठी केंद्र सरकारही सकारात्मक पावले उचलत असल्याचे त्यांनी सांगितले. स्मार्ट मीटर निर्मिती कंपन्यांना उद्देशून बोलताना सिंघल म्हणाले, ग्रामीण भागात स्मार्ट मीटरबाबत कनेक्टिव्हिटीची अडचण येऊ शकते. याकरिता कंपन्यांनी अधिक सुलभ तंत्रज्ञान विकसित करणे अपेक्षित असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. परिषदेत सीआयआय नॅशनल कमिटीचे सहअध्यक्ष डॉ. प्रवीर सिन्हा, आंध्र प्रदेशचे ऊर्जा सचिव श्रीकांत नागुलापल्ली, आसामचे प्रधान सचिव नीरज वर्मा, पंजाबचे प्रधान सचिव (ऊर्जा) वेणू प्रसाद, इंटेलिस्मार्ट इन्फ्रास्ट्रक्चर प्रा.लि.चे अध्यक्ष अनिल रावल, सेक्युअर मीटर लि.चे सुकेत सिंघलदेखील सहभागी झाले होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.