मुंबई

रद्द विमानप्रवास, सहलींचा परतावा साह्यासाठी, ग्राहक पंचायत सज्ज! प्रवाशांना मार्गदर्शक पत्रके जारी

कृष्ण जोशी

मुंबई ः कोरोनाकाळातील लॉकडाऊनमुळे रद्द झालेले विमान प्रवास तसेच सहली आदींचे पैसे पर्यटकांना परत मिळण्यासंदर्भात त्यांना साह्य करण्यासाठी मुंबई ग्राहक पंचायत सज्ज असून, त्यांनी याबाबत प्रवाशांना मार्गदर्शन करणारी पत्रकेही जारी केली आहेत. 

रद्द विमान प्रवासाबद्दल विमान कंपन्यांनी ग्राहकांना क्रेडिट शेल दिले असले तरीही त्या रकमेचा पूर्ण परतावा ग्राहकांना व्याजासह मिळायला हवा. त्याबाबत काही शंका असल्यास प्रवाशांनी मुंबई ग्राहक पंचायतीला ई-मेल पाठवावा, असे आवाहन कार्याध्यक्ष शिरीष देशपांडे यांनी केले आहे. 
प्रवाशांनी ऑनलाईन पद्धतीने किंवा एजंटामार्फत तिकीट काढले असले तरीही त्यांना परतावा मिळेल. परदेशी विमान कंपन्या क्रेडिट शेल देऊ शकत नाहीत. त्यांनी तत्काळ पैसे परत दिले पाहिजेत. याबाबत सर्वोच्च न्यायालयाने आदेश देऊनही अनेक विमान कंपन्या प्रवाशांना पैसे परत देत नाहीत. त्यामुळे ग्राहकांनी यासंदर्भात संबंधित विमान कंपनी, एजंट, प्रवासी कंपनी आदींकडे तिकीट रकमेच्या परताव्याची मागणी करावी. त्यासोबत ग्राहक पंचायत व डीजीसीए यांनाही पुढील ई-मेलवर सीसी ठेवावे, असेही देशपांडे यांनी म्हटले आहे. यासंदर्भात mgptakrar@gmail.com व dgoffice.dgca@nic.in येथेही तक्रार करावी, असेही आवाहन ग्राहक पंचायतीने केले आहे. 

दरम्यान, पर्यटन कंपन्यांमार्फत सहलींचे आरक्षण केलेल्या ग्राहकांनाही परतावा मिळत नसल्याबाबत मुंबई ग्राहक पंचायत व केंद्रीय पर्यटन महासंचालक यांच्या पुढाकाराने पर्यटन कंपन्यांसोबत बैठक झाली. पर्यटन कंपन्यांकडून परताव्याबाबत ग्राहकांवर होत असलेल्या अन्यायाची माहिती देशपांडे आणि अर्चना सबनीस यांनी दिली. अनेक युरोपीय देशांनी पर्यटन कंपन्यांना ग्राहकांचे पैसे परत देण्याचे आदेश दिले आहेत. विमानप्रवास रकमेच्या परताव्याचा सर्वोच्च न्यायालयाचा आदेश हा पर्यटन किंवा सहलीतील विमान प्रवासालाही लागू होत असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केल्याचेही देशपांडे यांनी सांगितले. त्यामुळे याबाबत संबंधितांनी पुढील आठवड्यात आपले प्रस्ताव मांडावेत व यावर चर्चेतून तोडगा काढला जाईल, असे पर्यटन मंत्रालयाच्या अतिरिक्त महासंचालक श्रीमती रुपिंदर ब्रार यांनी सांगितले. 

Consumer Panchayat ready for canceled flights, return of trips Issuance of guide sheets to passengers

--------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SA vs IND: भारताचा वर्षातील शेवटच्या T20I सामन्यात विक्रमी विजय! द. आफ्रिकेविरुद्ध मालिकाही जिंकली

Dolly Chaiwala: डॉली चायवाला भाजपचा स्टार प्रचारक! नागपूरमध्ये केला महायुतीसाठी प्रचार

Rohit Sharma दुसऱ्यांदा झाला बाबा! रितिकाने दिला मुलाला जन्म; हिटमॅन आता ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार?

Record Breaker: Sanju Samson ची शतकासह विश्वविक्रमाला गवसणी; तिलक वर्मासह नोंदवले मोठे विक्रम अन्... Video

Assembly Elections: २४ ते ३० मतदारसंघ महत्त्वाचे! दोन्ही आघाड्यांना बंडाचा फटका बसणार,'शांती' यज्ञासाठी पळापळ सुरू

SCROLL FOR NEXT