lockdown 4 
मुंबई

मुंबईत चौथ्या लॉकडाऊनमध्ये कोरोनाची साखळी मोडणार?.. तिसऱ्या टप्प्यात तब्बल ११ हजार रुग्ण

सकाळ वृत्तसेवा

मुंबई:  कोरोनाचा प्रार्दुभाव सर्वाधिक हा मुंबईत आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधितांची संख्या वाढताना दिसत आहे. देशभरात आजपासून चौथ्या टप्प्यातील लॉकडाऊनला सुरुवात झाली. महाराष्ट्रात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारीच लॉकडाऊन संदर्भातले आदेश काढले. रविवारी तिसऱ्या टप्प्यातील लॉकडाऊनचा शेवटचा दिवस होता. त्याचदरम्यान एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. 

 तिसऱ्या टप्प्यातील लॉकडाऊनमध्ये मुंबईत तब्बल ११ हजार ३५० नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. लॉकडाऊनचा तिसरा टप्पा ४ ते १७ मे या काळात घेण्यात आला होता. राज्यातल्या आरोग्य मंत्रालयाच्या डेटावरुन हिंदुस्थान टाइम्सनं यासंदर्भातलं वृत्त प्रकाशित केलं आहे.

तर तिसऱ्या लॉकडाऊनमध्ये राज्यात एकूण ६३० मृत्यू झाल्याची नोंद झाली असून तब्बल २०,०७९ रुग्ण आढळलेत. मुंबईत लॉकडाऊनच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच रविवारी १५९५ कोरोनाबाधित रुग्ण सापडले. एकाच दिवशी इतके रुग्ण सापडण्याची ही पहिलीच वेळ आहे. 

दुसरा लॉकडाऊन तीन मे रोजी संपला. त्यावेळी मुंबईत कोरोनाचे ८८०० रुग्ण होते आणि ३४३ जणांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली होती. दुसरा लॉकडाऊन संपत असताना म्हणजेच ३ मे रोजी राज्यात कोरोनाचे १२ हजार ९७४ रुग्ण होते आणि ५४८ जणांचा मृत्यू झाला होता. 

१७ मे रोजीचा आकडा काय सांगतो: 

१७ मे रोजीचा कोरोनाबाधिताचा आकडा पाहिल्यावर ३३,०५३ झाली तर ११९८ जणांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली. मुंबईत धारावी हा कोरोनाचा हॉटस्पॉट ठऱला आहे. रविवारी धारावीत ४४ नवे कोरोनाबाधित रुग्ण सापडले. त्यामुळे धारावीतील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १२४२ च्यावर पोहोचली आहे. तर धारावीत आतापर्यंत ५६ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे पहिल्या तीन लॉकडाऊनचा टप्पा पाहिल्यावर चौथ्या लॉकडाऊनमध्ये तरी आकडा कमी करण्यात यश येतं का ते पाहावं लागेल. कारण पहिल्या तीन टप्पा पाहिल्यावर लक्षात येतं की, लॉकडाऊनच्या टप्प्यानुसार कोरोनाबाधितांचा आकडा वाढत जात आहे. 

मुंबई महापालिकेचं आवाहन: 

मुंबईतल्या धारावी, वरळी, कुर्ला, दहिसर यासारख्या भागात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनाबाधितांचा आकडा कमी करण्यासाठी राज्य सरकार आणि मुंबई महापालिका धारावी आण वरळीसह अन्य ठिकाणी विशेष प्रयत्न करत आहेत. पालिका कोरोनाला रोखण्यासाठी विविध स्तरातून प्रयत्न करत आहेत. त्यामुळे घराबाहेर पडू नका. घरी राहा आणि सुरक्षित राहा, असं आवाहन पुन्हा एकदा मुंबई महापालिकेनं लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात मुंबईकरांना केलं आहे.

corona chain will brajke in lockdown 4 ? lockdown 3 noted 11 thousand patients read full story  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT