high court 
मुंबई

'या' कारणाने उच्च न्यायालयाच्या यंदाच्या उन्हाळी सुट्ट्या रद्द

सकाळवृत्तसेवा

मुंबई : दरवर्षी येणारी उच्च न्यायालयाची उन्हाळी सुट्टी यंदा कोरोनामुळे रद्द करण्याचा निर्णय उच्च न्यायालय प्रशासनाने घेतला आहे. जर लॉकडाऊन अधिक वाढला नाही तर उन्हाळी सुट्टीत अर्धा तास जादा म्हणजे साडे दहा वाजता न्यायालयाचे कामकाज सुरु करण्यात येणार आहे.

देशभरात सध्या लॉकडाऊन सुरु आहे आणि सर्व वाहतूक व्यवस्थाही बंद आहे. त्यामुळे उच्च न्यायालयानेही सोशल डिस्टन्सिंगमुळे व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणी सुरु केली आहे. लॉकडाऊनचा कालावधी ता. 3 मेपर्यत आहे. त्यानंतर लॉकडाऊन उठला आणि परिस्थिती सर्वसामान्य होत असेल तर उन्हाळ्यात न्यायालयांचे कामकाज नियमित सुरु होऊ शकते. ता. 7 मे ते ता. 7 जूनपर्यंत न्यायालयाला उन्हाळी सुट्टी आहे. मात्र यंदा ही सुट्टी होणार नसून कामकाज सुरु राहणार आहे. तसेच नेहमी 11 वा. सुरु होणारे काम या कालावधीत अर्धा तास लवकर सुरु होईल, त्यामुळे साडेदहा ते पाच या वेळेत काम चालू राहील, असे न्याय प्रशासनाच्या वतीने रजिस्ट्रार जनरल एस बी अग्रवाल यांनी सांगितले. मुंंबईसह, औरंगाबाद आणि नागपूर खंडपीठाचे कामकाजही सुरु राहणार असून जिल्हा न्यायालयांंचे कामही सुरु असेल.जर 3 मे नंतरही लॉकडाऊन सुरु राहिला तर सध्या आहे त्याप्रकारे काम होईल, असेही स्पष्ट केले आहे. 

दिल्ली उच्च न्यायालयानेही उन्हाळी सुट्टी रद्द केली आहे तर सर्वोच्च न्यायालयातही तेथील वकिलांनी सुट्टी रद्द करण्याची मागणी केली आहे. सध्या उच्च न्यायालयात पाच स्वतंत्र न्यायालयामार्फत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणी घेण्यात येते.
 

 Corona effect High Court cancels summer vacation

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Baba siddiqui case: बाबा सिद्दीकींच्या हत्येचा कट रचणाऱ्या शुभम लोणकरच्या निशाण्यावर पुण्यातील बडा नेता; पोलिस तपासात धक्कादायक माहिती

Supriya Sule: बुलेट ट्रेनसाठी करोडो रुपये खर्च करतात; पण मुलांच्या शिक्षणासाठी निधी नाही, सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल

Latest Maharashtra News Updates : गृह मतदान मोहिमत ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांनी बजावला मतदानाचा हक्क

Mumbai Temperature: मुंबईच तापमान पुन्हा वाढलं, कमाल तापमान ३६.८ अंशांवर

Government Job: जिल्हा परिषद भरतीमध्ये घोळ? 19 नोव्हेंबरपर्यंत स्पष्टीकरण सादर करण्याचे कोर्टाचे आदेश

SCROLL FOR NEXT