मुंबई : मुंबईत आज 208 नवीन रुग्ण (corona new patient) सापडले. एप्रिल 2020 नंतरची ही सर्वात कमी रुग्णसंख्या आहे. यार या महिन्यात तिसऱ्यांदा 300 पेक्षा कमी रुग्णसंख्या नोंदवण्यात (corona virus) आली असून 2 ऑगस्ट ला 259 व 3 ऑगस्ट ला 288 नवे रुग्ण सापडले होते. तर आज 3 रुग्ण दगावले (corona deaths) असून या महिन्यात दुसऱ्यांदा इतके कमी मृत्यू नोंदवले गेले. गेल्या 25 दिवसांपासून मुंबईत 500 पेक्षा कमी रुग्णसंख्या (less corona patients) नोंदवण्यात येत आहे.
कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या 7,37,724 इतकी झाली आहे.आज 372 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून आतापर्यंत 7,15,389 रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत. मुंबईत आज 26,445 कोविड चाचण्या करण्यात आल्या असून आतापर्यंत एकूण 84,39,521 कोरोना चाचण्या करण्यात आल्या. मुंबईत आज दिवसभरात 3 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली असून मुंबईतील मृतांचा आकडा 15 हजार 954 इतका झाला आहे. आज मृत झालेल्या रुग्णांपैकी 3 रुग्णांना दीर्घकालीन आजार होते. मृत्यू झालेल्यांमध्ये 1 पुरुष तर 2 महिला रुग्णांचा समावेश होता. मृत्यू झालेल्या रुग्णांपैकी एका रुग्णाचे वय 40 ते 60 वर्षा दरम्यानचे होते तर 2 रुग्णाचे वय 60 वर्षा वरील होते.
रुग्ण दुपटीचा कालावधी वाढून 1680 दिवसांवर गेला आहे. रुग्णवाढीचा सरासरी दर ही 0.4 % पर्यंत खाली आला आहे. नव्या रुग्णांपेक्षा आज बरे होणारे रुग्ण अधिक असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढून 97 % पर्यंत गेले आहे. तर रुग्णसंख्या नियंत्रणात आल्याने सक्रिय रुग्णांचा आकडा कमी होऊन 3,961 हजारांवर आला आहे. मुंबईत सक्रिय कंटेंटमेंट झोन ची संख्या संख्या 1 असून सीलबंद इमारतींची संख्या ही 35 आहे. गेल्या 24 तासांत 1,004 अति जोखमीचे संपर्क समोर आले असून 757 जणांना कोविड काळजी केंद्र 1 मध्ये दाखल करण्यात आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.