मुंबई : मुंबईत आज 267 नवीन रुग्ण (corona new patient) सापडले. तर आज 4 रुग्ण (corona deaths) दगावले. कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या 7,39,336 इतकी झाली आहे.आज 308 रुग्णांनी कोरोनावर मात केली (corona free patient) असून आतापर्यंत 7,18,083 रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत. मुंबईत आज 35,707 कोविड चाचण्या (corona test) करण्यात आल्या असून आतापर्यंत एकूण 86,52,262 कोरोना चाचण्या करण्यात आल्या.
मुंबईत आज दिवसभरात 4 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली असून मुंबईतील मृतांचा आकडा 15 हजार 989 इतका झाला आहे. आज मृत झालेल्या रुग्णांपैकी 4 रुग्णांना दीर्घकालीन आजार होते. मृत्यू झालेल्यांमध्ये 3 पुरुष तर 1 महिला रुग्णांचा समावेश होता. मृत्यू झालेल्या रुग्णांपैकी 1 रुग्णाचे वय 40 ते 60 वर्षा दरम्यानचे होते तर 3 रुग्णाचे वय 60 वर्षा वरील होते. रुग्ण दुपटीचा कालावधी वाढून 1,921 दिवसांवर गेला आहे. रुग्णवाढीचा सरासरी दर ही 0.4 % पर्यंत खाली आला आहे. नव्या रुग्णांपेक्षा आज बरे होणारे रुग्ण अधिक असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढून 97 % पर्यंत गेले आहे. तर रुग्णसंख्या नियंत्रणात आल्याने सक्रिय रुग्णांचा आकडा कमी होऊन 2,834 हजारांवर आला आहे.
कोरोना नियंत्रणात आल्याने मुंबईत सक्रिय कंटेंटमेंट झोन ची संख्या 0 झाली. सीलबंद इमारतींची संख्या ही कमी होऊन 22 पर्यंत खाली आली आहे. गेल्या 24 तासांत 3,006 अति जोखमीचे संपर्क समोर आले असून 751 जणांना कोविड काळजी केंद्र 1 मध्ये दाखल करण्यात आले आहे.
माहीम मध्ये शून्य रुग्ण
धारावी नंतर आज माहीम मध्ये शून्य रुग्णांची नोंद झाली.तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर धारावी माहीम मधील परिस्थिती नियंत्रणात आल्याने समाधान व्यक्त होत आहे. माहीम एकूण रुग्णसंख्या 10,262 इतकी आहे. सक्रिय रुग्णांची संख्या केवळ 43 असून आतापर्यंत 9973 रुग्ण बरे झाले आहेत.आज धारावी आणि दादर मध्ये प्रत्येकी केवळ एका रुग्णाची भर पडली. जी उत्तरमध्ये 2 रुग्ण सापडले असून बाधित रुग्णांची संख्या 27,207 इतकी आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.