मुंबई : कोविडकाळात (corona pandemic) अत्यंत उत्तम सेवा देणारे अंधेरीचे (Andheri) सेव्हल हिल्स हॉस्पीटल (seven hills hospital) आता कोविडची लाट (corona wave) ओसरत चालल्याने कोविड व्यतिरीक्त इतर आजारांसाठीही पूर्ण क्षमतेने वापरावे, अशी मागणी प्रभाग क्रमांक 84 चे भाजप नगरसेवक अभिजीत सामंत (Abhijit samant) यांनी केली आहे.
यासंदर्भात महापालिका आयुक्तांना लिहिलेल्या पत्रात त्यांनी ही मागणी केली आहे. अन्य रोगांसाठीदेखील हे रुग्णालय पूर्ण क्षमतेने वापरल्यास परिसरातील गरीब रुग्णांना उत्तम आरोग्यसेवा रास्त दरात मिळतील, असेही सामंत यांनी दाखवून दिले आहे. कोविडच्या पहिल्या टप्प्यात मरोळ-अंधेरी येथील या रुग्णालयाचा पूर्ण क्षमतेने वापर करून महापालिकेने कित्येक रुग्णांचे प्राण वाचवले. या रुग्णालयात पश्चिम उपनगरांमधील अनेक रुग्णांना दर्जेदार आरोग्यसेवा मिळाली.
त्याखेरीज लसीकरण मोहिमेतही येथून रोज किमान एक हजार जणांना लस टोचून सुरक्षा कवच देण्यात आले. यावर्षी जानेवारी ते मार्च दरम्यान कोविडची पहिली लाट ओसरल्याने या रुग्णालयातील दोनशे खाटा कोविडव्यतिरिक्त अन्य रुग्णांसाठी वापरण्यात आल्या. मात्र नंतर पुन्हा कोविडच्या दुसऱ्या लाटेत ही सुविधा बंद करून फक्त कोविड रुग्णांनाच सेवा देण्यात आली.
जानेवारी ते मार्च महिन्यात येथे हृदयविकार, मूत्रपिंड, मेंदू आदी जटिल आजारांवर उपचार झाले. पण नंतर ते बंद झाल्याने रुग्णांचे हाल होत आहेत. आता ऑक्टोबर महिन्यात कोरोना उताराला लागल्याने हे रुग्णालय पुन्हा अन्य रोगांसाठी पूर्ण क्षमतेने सुरु करावे. या रुग्णालयातील कॅथलॅब, रेडिएशन थेरेपी, न्यूक्लिअर मेडिसीन, नेफ्रोलॉजी, एंडोक्रिनोलॉजी, न्युरोलॉजी मधील सुविधांचा वापर करून हृदयविकार, कर्करोग, मूत्रपिंड, मेंदू, डायबिटीस, थायरॉईड या गंभीर आजारांवरील वैद्यकीय सेवा रुग्णांना उपलब्ध करून द्यावी, असेही सामंत यांनी या पत्रात म्हटले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.