मुंबई : कोविड महामारीवर (corona pandemic) आरोग्य विभागाने (health authorities) अशा प्रकारे लक्ष केंद्रित केले आहे की, इतर आजारांचा शोध घेणे मोठ्या प्रमाणात प्रभावित झाले आहे. यापैकी एक म्हणजे डासांमुळे (mosquitoes) होणारे आजार. वर्ष 2019 मध्ये मलेरिया चाचणीमध्ये (Malaria test) 33.6 टक्के आणि 2021 च्या तुलनेत डेंग्यू चाचणीत (Dengue test) 62.9 टक्के घट झाली आहे. या वर्षातही सध्या चाचणीचे प्रमाण कमी आहे, अशा परिस्थितीत तज्ज्ञांच्या चाचणी वाढवण्याच्या सूचना दिल्या आहेत.
आरोग्य विभागाकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार, 2019 मध्ये मलेरियासाठीची 1 कोटी 25 लाख 326 चाचणी करण्यात आली, तर 2021 मध्ये ऑगस्टपर्यंत केवळ 86 लाख 39 हजार 405 चाचण्या झाल्या. त्याचप्रमाणे 2019 मध्ये डेंग्यूच्या 4 लाख 63 हजार 405 चाचण्या झाल्या होत्या, तर या वर्षी ऑगस्टपर्यंत 1 लाख 73 हजार 593 चाचण्या झाल्या आहेत. या आकडेवारीत आणखी काही महिन्यांचा अहवाल जरी जोडला गेला तरीही 2019 च्या तुलनेत चाचण्यांची संख्या कमी आहे.
राज्य सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे म्हणाले की, कोरोना महामारी आल्यानंतर आरोग्य यंत्रणांचे लक्ष बदलले. बहुतेक लोक कोविड ड्यूटीमध्ये गुंतले होते, लॉकडाऊनमुळे लोक घराबाहेर पडले नाहीत, बरेचसे लोक हॉस्पिटलमध्ये आले नाहीत, त्यामुळे चाचण्यांची संख्या खूप कमी होती. आता कोविड नियंत्रणात आहे, पुन्हा एकदा आम्ही डेंग्यू, मलेरियावर लक्ष केंद्रित केले आहे.
डेंग्यू रुग्णांमध्ये 300%, मलेरियात 166% वाढ
2019 च्या तुलनेत वर्ष 2021 मध्ये चाचणीची संख्या कमी असली तरी 2021 मध्ये डेंग्यू, मलेरियामुळे अधिक लोक प्रभावित झाले आहेत. 2019 मध्ये 2064 लोकांना डेंग्यूची लागण झाली होती, तर 2021 मध्ये 13 ऑक्टोबरपर्यंत 8972 (334.69 टक्के) लोकांना डेंग्यूची लागण झाली. त्याच वेळी, 2019 मध्ये 4071 लोकांना मलेरियाची लागण झाली होती, तर या वर्षी 10836 (166.71 टक्के) लोक या रोगामुळे प्रभावित झाले आहेत.
नॉन कोविड रोगांवर लक्ष केंद्रित
"कोविडमुळे इतर नाॅन कोविड आजारांवरील लक्ष पूर्णपणे हलले आहे. परिणामी नॉन कोविड आजार वाढत आहेत. मग तो डेंग्यू असो किंवा मलेरिया किंवा टीबी. आता वेळ आली आहे की प्रशासनाने कोविड व्यतिरिक्त आजारांवर देखील अधिक लक्ष दिले पाहिजे. त्यांच्या प्रतिबंधापासून ते उपचारापर्यंत सर्वच गोष्टींवर लक्ष दिले पाहिजे."
- डॉ. टी. जेकब जॉन
वरिष्ठ व्हायरॉलॉजिस्ट आणि आयसीएमआरचे माजी संचालक व्हायरॉलॉजी विभाग
मलेरिया ( 3 वर्षाचा आकडेवारी)
वर्ष चाचणी पाॅझिटिव्ह
2019 17250326 4071
2020 9827957 12909
2021 8140574 10836
डेंग्यू (3 वर्षांची आकडेवारी)
वर्ष चाचणी पाॅझिटिव्ह
2019 463405 2064
2020 171923 3356
2021 173593 8972
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.