mumbai municipal corporation sakal
मुंबई

Mumbai News : कोरोना काळातील खर्चाचा लेखाजोखा तयार करण्याच्या कामाला पालिका अधिका-यांना जुंपले

कोरोना काळात 12 हजार कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा ठपका कॅगने ठेवला आहे. ईडीही त्या खर्चाची चौकशी करीत आहे.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई - कोरोना काळात 12 हजार कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा ठपका कॅगने ठेवला आहे. ईडीही त्या खर्चाची चौकशी करीत आहे. कोरोना काळातील संपूर्ण खर्चाची लेखाजोखा तयार करण्याच्या कामाला पालिकेचे अधिकारी लागले असल्याचे समजते. पालिकेच्या चोवीस विभाग कार्यालयांतील अधिकारी या कामाला जुंपले असल्याचे समजते.

कॅगच्या तपासात 12 हजार कोटी 3 हजार 500 कोटीहून अधिक खर्च कोविड व्यवस्थापनाशी संबंधित आहे. यात 13 जम्बो कोविड सेंटर, 24 वॉर्ड कार्यालये, पाच मोठी रुग्णालये, 16 सर्वसाधारण रुग्णालये यांचा समावेश आहे. कोविड काळात वारेमाप खर्च केला आहे. त्याचा हिशेब लागत नाही असा ताशेरे कॅगने मारले होते.

आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय शिवसेनेचे पदाधिकारी सूरज चव्हाण यांचे चेंबूर येथील निवासस्थान आणि खासदार संजय राऊत यांचे निकटवर्तीय सुजित पाटकर यांच्या सांताक्रूझ येथील निवासस्थानी ईडीने छापे टाकले. तसेच कोरोना काळात मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त असलेल्या सनदी अधिकारी संजीव जयस्वाल यांनाही ईडी चौकशी सुरू आहे.

खरेदी केलेल्या प्रत्येक साहित्यांच्या कार्यादेशासह झालेल्या खर्चाचा अहवाल आपल्या स्वाक्षरीसह तयार करण्याच्या सूचना केल्या आहेत. तसेच सर्व अधिकाऱ्यांना जमा खर्चाचा लेखाजोखा तयार करण्याच्या कामाला लागले आहेत. तपास यंत्रणांना देण्यासाठी ते तयार करायचे असल्याने त्यात काही उणीवा राहिल्यास चौकशीला सामोरे जाण्याच्या भितीने अधिका-याचे धाबे दणाणले आहे.

पालिका आयुक्तांच्या सुचना

खरेदी प्रक्रियेमध्ये सहभागी असलेल्या सर्व रुग्णालय आणि कोविड सेंटरचे अधिष्ठाता, वैद्यकीय अधिकारी, मध्यवर्ती खरेदी खाते आणि २४ विभागांचे सहायक आयुक्त हे खर्चाचा लेखाजोखा तयार करीत असल्याचे समजते. तपास यंत्रणांच्या अधिका-याना पूर्ण सहकार्य देण्याचे आदेश पालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांनी दिल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT