मुंबई

शरद पवारांची ब्रीच कँडीमध्ये झाली कोरोना टेस्ट, रिपोर्टबद्दल राजेश टोपे म्हणालेत...

सुमित बागुल

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या घरी कोरोनाचा शिरकाव झालाय. शरद पवार यांच्या मुंबईतील निवासस्थानावर म्हणजेच सिल्व्हर ओक बंगल्यावर कोरोनाचा शिरकाव झालाय. शरद पवारांच्या सुरक्षा रक्षकांना आणि घरातील जेवण बनवणाऱ्या दोघांना कोरोनाची लागण झालीये. शरद पवारांच्या सुरक्षा रक्षकांना कोरोनाची लक्षणं दिसत होती. यानंतर काहींच्या टेस्ट करण्यात आल्यात. पहिल्या टप्प्यात करण्यात आलेल्या सहा सुरक्षा रक्षकांपैकी दोघांच्या टेस्ट पॉझिटिव्ह आल्या होत्या. यानंतर सिल्व्हर ओक वरील सर्व स्टाफच्या कोरोना टेस्ट करण्यात आल्यात. 

दरम्यान, गेले काही दिवस शरद पवार मुंबईत आपल्या निवास्थानी सिल्व्हर ओक वरच आहेत. सुरक्षा रक्षकांना कोरोनाची लागण झाल्यानंतर स्वतः शरद पवारांनीही मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात कोरोना चाचणी करण्यात आली. दिलासादायक बाब म्हणजे शरद पवार यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली आहे. महाराष्ट्राचे सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्वतः याबाबत माहिती दिली आहे. 

राजेश टोपे म्हणालेत : 

'सिल्व्हर ओक'वर काम करणाऱ्या दोघांना आणि शरद पवारांच्या तीन सुरक्षारक्षकांना कोरोनाची लागण झालीये. सुरक्षारक्षक कायम लोकांना शरद पवारांपासून दूर करत असतात. त्यामुळे सुरक्षा रक्षकांना कोरोनाची लागण झाली असावी, असं राजेश टोपे म्हणालेत.

काल शरद पवारांची मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात अँटीजेन चाचणी आणि सर्व चाचण्या करण्यात आल्यात. शरद पवारांना कुठेही काहीही प्रॉब्लेम नाही. त्यांची चाचणी निगेटिव्ह आली आहे. शरद पवार यांच्या घरातील ज्यांना कोरोनाची लागण झालीये त्यांचं हाय रिस्क आणि लो रिस्क कॉन्टॅक्ट ट्रेसिंग केलं जाणार आहे. प्रोटोकॉलनुसार सर्व गोष्टी पाळल्या जातायत असं राजेश  टोपे म्हणालेत. 

corona test of sharad pawar is negative says rajesh tope read full news

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray : हेलिपॅडवर बॅग तपासणीसाठी कुणी पुढं आलं नाही, उद्धव ठाकरे म्हणाले- आज मला.....

Latest Maharashtra News Updates : पोलिस असल्याच्या बहाण्याने सराफाची फसवणूक

सुबोध-तेजश्रीचे जुळले सूर ; बहुप्रतीक्षित हॅशटॅग तदैव लग्नम सिनेमाचा पहिला टीझर प्रेक्षकांच्या भेटीस

Dev Diwali 2024: देव दिवाळी का साजरी केली जाते? वाचा इतिहास अन् धार्मिक महत्व

Supriya Sule In Nashik : कांद्याला हमीभाव मिळवून देणार; खासदार सुप्रिया सुळे यांची चांदवडच्या सभेत ग्वाही

SCROLL FOR NEXT