मुंबईः मिशन बिगिन अगेन अंतर्गत अनेक निर्बंध शिथील करण्यात येत असताना राज्यात ३१ ऑक्टोबरपर्यंत लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. देशात महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक करोना बाधित रुग्ण आहेत. ही रुग्णसंख्या सातत्याने वाढत चालली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले असले तरी दररोज नव्याने आढळणाऱ्या रुग्णांचे प्रमाणही मोठे असल्याने चिंता कायम आहे. राज्यात अनलॉक ५ ची प्रक्रिया सुरु असली तरीही कोरोनाचा धोका काही केल्या कमी होताना दिसत नाही आहे. याच पार्श्वभूमीवर नवी मुंबईतून एक मोठी बातमी समोर आली आहे. नवी मुंबईत आजपासून ३१ ऑक्टोबरपर्यंत लॉकडाऊन असणार आहे.
नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील हॉटस्पॉट क्षेत्रात कोरोनाचा प्रार्दुभाव वाढत चालला आहे. त्यामुळे नवी मुंबई पालिकेच्या आयुक्तांनी ३१ ऑक्टोबर २०२० च्या रात्री १२ वाजेपर्यंत लॉकडाऊन जाहीर केला आहे. ११ ठिकाणी हा लॉकडाऊन लागू करण्यात आला असल्याची माहिती देण्यात आलीय. नवी मुंबईत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असल्यानं कंटेन्मेंट झोन असणाऱ्या सर्व ठिकाणी लॉकडाऊन जाहीर करण्यात आलाय.
साथरोग नियंत्रण अधिनियम, १८९७ च्या कलम २ अन्वये तसेच आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, २००५च्या सर्व तरतूदींसह मनपा आयुक्त अभिजीत बांगर यांनी हॉटस्पॉट आणि कंटेन्मेंट झोनमध्ये हा लॉकडाऊन सुरू राहणार असल्याचं म्हटलं आहे. ११ कंटेन्मेंट झोनमधील लॉकडाऊनचे आदेश देण्यात आले. त्यामुळे लॉकडाऊन जाहीर केलेल्या नागरिकांसाठी नियमही कठोर करण्यात आलेत. यामुळे अनलॉकमध्ये शिथील करण्यात आलेले नियमही आता पुन्हा कठोर करण्यात आलेत.
मुंबईच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
आयुक्तांनी यांनी कंटेन्मेंट झोनची यादी आणि निर्बंध जाहीर केलेत. आयुक्तांनी दिलेल्या आदेशात शाळा, कॉलेज आणि शैक्षणिक संस्था तसंच कोचिंग इन्स्टिट्यूट ३१ ऑक्टोबरपर्यंत बंद असतील. यासोबतच सिनेमागृह, तरणतलाव, मनोरंजन उद्याने, थिएटर्स, ऑडिटोरिअम इत्यादी स्थळे बंद राहतील. मेट्रो सेवा देखील बंद असणारेय. केंद्रीय गृह विभागाच्या मान्यतेखेरीज आंतरराष्ट्रीय प्रवासी वाहतूकीवरही बंदी असणार आहे.
त्यासोबतच सामाजिक, राजकीय, मनोरंजन, शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रमास परवानगी नसेल. सर्व अत्यावश्यक वस्तूची दुकाने यापूर्वीच्या आदेशानुसार सुरू राहतील. यापूर्वीच्या आदेशाने वेळोवेळी देण्यात आलेल्या बाबी सुरू राहतील.
Corona Update navi mumbai lockdown till 12 midnight 31 October 2020 11 containment zones
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.