एका लसीच्या डोस साठी नालासोपाऱ्यात रात्रभर नागरिकांचे जागरण sakal
मुंबई

एका लसीच्या डोस साठी नालासोपाऱ्यात रात्रभर नागरिकांचे जागरण

अक्षरशा घरदार, मुलं सोडून, अन्न पाण्या वाचून रात्रभर नागरिकांनी जागरण केल्याचे विदारक चित्र पाहायला मिळाले

विजय गायकवाड

नालासोपारा : प्रदीर्घ कालावधी नंतर दोन डोस घेतलेल्या नागरिकांना लोकल (local train) मध्ये प्रवेश दिला जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री (uddhva thackeray) यांनी केली आहे. मुख्यमंत्र्यांच्या घोषणेनंतर आज मंगळवारी (10 ऑगस्ट) रोजी सकाळी 9 वाजल्यापासून सुरू होणाऱ्या लसीकरणासाठी (corona vaccine) नालासोपाराच्या तुलिंज रुग्णालयातील लसीकरण केंद्रावर काल रात्री 2 वाजल्यापासून नागरिकांनी आपल्या रांगा लावायला सुरवात केली होती. (corona vaccine citizens all night Awakening nalasopara area)

लवकर रांगेत उभे राहिले तर आपणाला डोस मिळेल आणि आपणही लोकलचा फायदा उचलून कामावर जाऊ शकतो ही भोळी बाबडी अशा घेऊन अक्षरशा घरदार, मुलं सोडून, अन्न पाण्या वाचून रात्रभर नागरिकांनी जागरण केल्याचे विदारक चित्र पाहायला मिळाले आहे. लस घ्या म्हणून सरकार घोषणा करतय, पण लस उपलब्ध करून देत नसल्याने तीव्र संताप व्यक्त केल्या जात आहे.

वसई विरार महापालिका हद्दीत 25 लाखाच्या वर लोकसंख्या आहे. पहिल्या आणि दुसऱ्या कोरोनाच्या टप्प्यात शेकडो नागरिकांचा कोरोनाने बळी घेतला आहे. हजारो नागरिक बाधित झाले आहेत. दोन ते तीन दिवसाला 4 ते 5 हजार लसीचा साठा पालिकेला मिळत आहे. 9 ऑगस्ट रोजी 4 हजार 850 साठा लसीचा पालिकेला मिळाला होता. त्यावरून 17 केंद्रावर आज पालिकेने लसीकरण सुरू केले होते. नालासोपारा पूर्व तुलिंज रुग्णालय लसीकरण केंद्रावर 450 लस देण्यात आल्या होत्या. त्यापैकी 225 पहिला डोस तर 225 दुसरा डोस घेणाऱ्या नागरिकांसाठी याचे वाटप करण्यात आले आहे.

त्यात 50 टक्के ऑनलाईन आणि 50 टक्के ऑफलाईन प्रमाणे हे डोस देण्यात आले आहेत. पण 450 डोस साठी काल दुपारी 2 वाजल्यापासून नागरिकांनी लसीकरण केंद्रावर रांगा लावायला सुरवात केली होती. मध्यरात्री 12 च्या यानंतर आणखी ही गर्दी वाढत जाऊन सकाळी 1 हजाराच्या वर नागरिकांनी रांगा लागल्या होत्या. हीच परिस्थिती मोरगाव आरोग्य केंद्र, राणले तलाव आरोग्य केंद्र, या लसीकरण केंद्रावर सुद्धा होती. रात्रभर रांगेत बसलेल्या नागरिकांना पाणी, अन्न, किंवा कोणतीच सुविधा नसल्याने त्यांचे मोठे हाल झाले आहेत. शेवटी 15 ते 20 तास रांगेत उभे राहून सुद्धा सकाळी डोस मिळाला नसल्याने लोकप्रतिनिधी, प्रशासन आणि शासनावर तीव्र संताप नागरिकांनी व्यक्त केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SA vs IND: भारताचा वर्षातील शेवटच्या T20I सामन्यात विक्रमी विजय! द. आफ्रिकेविरुद्ध मालिकाही जिंकली

Dolly Chaiwala: डॉली चायवाला भाजपचा स्टार प्रचारक! नागपूरमध्ये केला महायुतीसाठी प्रचार

Rohit Sharma दुसऱ्यांदा झाला बाबा! रितिकाने दिला मुलाला जन्म; हिटमॅन आता ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार?

Record Breaker: Sanju Samson ची शतकासह विश्वविक्रमाला गवसणी; तिलक वर्मासह नोंदवले मोठे विक्रम अन्... Video

Assembly Elections: २४ ते ३० मतदारसंघ महत्त्वाचे! दोन्ही आघाड्यांना बंडाचा फटका बसणार,'शांती' यज्ञासाठी पळापळ सुरू

SCROLL FOR NEXT