मुंबई: मुंबईत गेल्या 30 दिवसांत पहिल्यांदाच सर्वात कमी कोरोना रुग्णांची नोंद झाली. 3 हजार 840 नवीन कोरोना रुग्ण सापडले असून दिवसेंदिवस पुन्हा एकदा कोरोना रुग्णांची संख्या कमी होताना दिसत आहे. ही एक दिलासादायक बाब असून मुंबईचा रिकव्हरी रेटही वाढ असून रुग्ण दुपटीचा दर 38 दिवसांवरुन थेट 62 वर पोहोचला आहे. 13 एप्रिल या दिवशी रुग्ण दुपटीचा कालावधी 38 दिवसांवर होता. तो 13 दिवसांनी 62 दिवसांवर पोहोचला आहे. म्हणजेच रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी वाढला झाला असून ही एक दिलासादायक बाब असल्याचे पालिका आरोग्य विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
दरम्यान, मुंबईत फेब्रुवारी आणि मार्च या कालावधीत कोरोना रुग्णांचा बरे होण्याचा दर ही कमी झाला होता. 9 ते 96 टक्क्यांवरुन तो थेट 79 टक्क्यांवर पोहोचला होता. मात्र, आता पुन्हा वाढून तो 87 टक्क्यांवर पोहोचला आहे. गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील दैनंदिन कोरोना रुग्णांचा आकडाही झपाट्याने खाला आहे. एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला मुंबईत दिवसाला 10 ते 11 हजाराच्या पटीत नवे कोरोना रुग्ण आढळत होते. पण, गेल्या 15 दिवसांत यामध्ये टप्प्याटप्प्याने घट होत हा आकडा आता 5 हजारांच्याही खाली गेला आहे. गेल्या 24 तासात 3 हजार 840 नव्या कोरोना बाधितांची नोंद झाली. ही आकडेवारी एप्रिल महिन्यात आढळणाऱ्या रुग्णसंख्येमधील सर्वात कमी आहे. त्यानुसार, या पंधरावड्यात मुंबईचा कोरोना दुप्पट होण्याचा दर 15 दिवसांनी वाढला असून तो सध्या 62 वर पोहोचला आहे.
13 दिवसांतील दुपटीचा दर
13 एप्रिल - 38 दिवस
14 एप्रिल - 40 दिवस
15 एप्रिल - 42 दिवस
16 एप्रिल - 43 दिवस
17 एप्रिल - 44 दिवस
18 एप्रिल - 45 दिवस
19 एप्रिल - 47 दिवस
20 एप्रिल - 47 दिवस
21 एप्रिल - 48 दिवस
22 एप्रिल - 50 दिवस
23 एप्रिल - 52 दिवस
24 एप्रिल - 54 दिवस
25 एप्रिल -58 दिवस
26 एप्रिल - 62 दिवस
रिकव्हरी रेट वाढला
दरम्यान, मुंबईचा रिकव्हरी रेट थेट 79 टक्क्यांवरुन 87 टक्क्यांवर पोहोचला आहे. त्यामुळे, शिवाय गेल्या 24 तासांच्या पालिकेच्या आकडेवारीनुसार, मुंबईत नवीन कोरोना रुग्णांच्या तुलनेत बरे होणार्यांची संख्या तिप्पट होती. मुंबईत काल दिवसभरात 9,150 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे ही एक सकारात्मक बाब असून लोकांनी आणखी शिस्त आणि नियम पाळले तर वाढलेली रुग्णसंख्या नियंत्रणात आणण्यात यश येईल असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
रिकव्हरीचा चढता आलेख
26 एप्रिल - 87 टक्के
25 एप्रिल - 86 टक्के
24 एप्रिल - 85 टक्के
16 एप्रिल - 82 टक्के
13 एप्रिल - 81 टक्के
12 एप्रिल - 80 टक्के
11 एप्रिल - 79 टक्के
---------------------------
(संपादन- पूजा विचारे)
corona virus duration of patient doubling rate mumbai is 62 days
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.