मुंबई

एकच नंबर! मुंबईत आतापर्यंत 'इतक्या' रुग्णांची कोरोनावर मात

पूजा विचारे

मुंबईः कोरोना व्हायरसनं सध्या सर्वत्र विळखा घातला आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा वाढताना दिसतोय. मुंबईत शहरात या व्हायरसचा सर्वाधिक प्रार्दुभाव झालेला पाहायला मिळाला. पण त्यातच राज्याचा आकडा पाहता सर्वाधिक कोरोना रुग्ण मुंबईत असले तरी मुंबईत कोरोना रुग्ण कमी होण्याचं प्रमाणही मोठं आहे. याच आठवड्याच्या सुरुवातीला समोर आलेल्या माहितीनुसार,  मुंबई महापालिकेनं घेतलेल्या अथक प्रयत्नातून मुंबईतील कोरोना नियंत्रणात आल्याचं स्पष्ट झालं आहे. मार्चपासून मुंबईत शिरकाव केलेला कोरोना संसर्ग आता नियंत्रणात येतोय. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी प्रशासनानं विविध पातळीवर प्रयत्न केले. त्यातच एक आणखीन दिलासादायक बातमी समोर आली आहे ती म्हणजे, मुंबईतील कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर दुप्पटीने वाढला आहे. तर आतापर्यंत ७३ हजाराहून अधिक रुग्णांनी कोरोनावर मात केलीय.

मुंबईत एकूण १ लाख ३ हजार ३६८ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यापैकी ७३ हजार ५५५ रुग्ण बरे झाले असून २३ हजार ७०२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. 

महापालिकेच्या आकडेवारीनुसार, जूनच्या तुलनेत जुलैमध्ये बरे होणाऱ्यांची संख्या दुप्पट झाली आहे. जूनच्या पहिल्या १८ दिवसात रोज सरासरी ८३७ रुग्ण बरे होत होते. जुलैच्या पहिल्या १८ दिवसात रोज १ हजार ४६२ रुग्ण बरे झालेत. १ जुलैपासून ते १८ जुलैपर्यंत २६ हजार ३२२ रुग्णांना घरी सोडण्यात आलं आहे.  तर १ ते १८ जून दरम्यान १५ हजार ५९ रुग्ण बरे झाल्यामुळे रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता.  २ जुलैला अवघ्या एका दिवसात सर्वाधिक ५ हजार ९०३ रुग्ण बरे होऊन घरी परतलेत. जून महिन्यात १५ जूनला सर्वाधिक ३ हजार १३९ रुग्णांना घरी सोडण्यात आलं होतं. आतापर्यंत कोरोनामुळे ५ हजार ८१७ आणि कोरोनासह इतर आजारांनी २९२ रुग्णांचा मुंबईत मृत्यू झाला आहे. जूनच्या तुलनेत जुलैमध्ये कोरोनाने बरे होणाऱ्यांची संख्या दुप्पट झाली आहे. 

मुंबईतील कोरोना रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ७० टक्के झालं आहे.  सध्या मुंबईतील कोरोनाचा डबलिंग रेट ५५ दिवसांवर गेला आहे. रोजचं रुग्णवाढीचं प्रमाण १.२६ टक्के आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईतील करोनाची परिस्थिती नियंत्रणात असून दिवसाला रोज १२०० ते १३०० रुग्ण सापडत आहेत. मात्र, तितक्याच प्रमाणात कोरोना रुग्ण बरे होऊन घरीही जात आहेत, अशी माहितीही समोर आली आहे.

corona virus mumbai district 70 thousand patients recovery till

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SA vs IND: भारताचा वर्षातील शेवटच्या T20I सामन्यात विक्रमी विजय! द. आफ्रिकेविरुद्ध मालिकाही जिंकली

Dolly Chaiwala: डॉली चायवाला भाजपचा स्टार प्रचारक! नागपूरमध्ये केला महायुतीसाठी प्रचार

Rohit Sharma दुसऱ्यांदा झाला बाबा! रितिकाने दिला मुलाला जन्म; हिटमॅन आता ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार?

Record Breaker: Sanju Samson ची शतकासह विश्वविक्रमाला गवसणी; तिलक वर्मासह नोंदवले मोठे विक्रम अन्... Video

Assembly Elections: २४ ते ३० मतदारसंघ महत्त्वाचे! दोन्ही आघाड्यांना बंडाचा फटका बसणार,'शांती' यज्ञासाठी पळापळ सुरू

SCROLL FOR NEXT