मुंबई : कोरोना संदर्भातील एक अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट समोर येतेय. एकीकडे दिवाळीनंतर कोरोनाचे रुग्ण काही प्रमाणात वाढत असताना मुंबईतून एक दिलासादायक बातमी समोर येतेय. कोरोनाच्या लसींची साठवणूक करण्यासाठी एका विशिष्ठ तापमानाची गरज भासते. अत्यंत कमी तापमानात या लसींना ठेवावं लागतं. दरम्यान मुंबईत आता कोरोनाची लस आल्यानंतर तिची साठवणूक कुठे करायची याबद्दल जागाही मुंबईतील जागा निवडली गेली आहे. मुंबई आणि उपनगरांची लोकसंख्या पाहता कोरोना लस साठवण्यासाठी मोठ्या जागेची गरज भासणार होती. त्यासाठी आता जम्बो कोल्ड स्टोरेज उभारलं जाणार आहे.
महत्त्वाची बातमी : बहिणी लिफ्टबाहेर निघाल्यात, मात्र पाच वर्षीय भाऊ निघताना सेफ्टी डोअर झालं बंद; लिफ्टमध्ये चिरडून चिमुरड्याचा मृत्यू
भारतात लवकरच कोरोनाची लस सर्वसामान्य नागरिकांसाठी उपलब्ध होणार आहे. भारतात एकूण पाच कंपन्यांमार्फत लसीच्या चाचण्या सुरु आहेत. अशात ऑक्सफर्ड विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी बनवलेल्या लसीचे पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूटमध्ये उत्पादन करण्यात येणार आहे. ही लास भारतात सर्वात आधी उपलब्ध होईल असं बोललं जातंय. अशात कोरोनाच्या लसींच्या साठवणुकीसाठी मुंबई महानगरपालिकेने तीन जागा निश्चित केल्या आहेत. BMC ने कांजूरमार्ग ते भांडुप या परिसरात एका जम्बो कोल्ड स्टोरेजची जागा निश्चित केली आहे.
मुंबईतील भांडुप, कांजूरमार्ग या परिसरात कोरोनाचे जम्बो कोविड वॅक्सीनसेंटर उभारण्यात येणार आहे. यामुळे मुंबई आणि मुंबई बाहेरील उपनगरांमध्ये कोरोनाचा पुरवठा करणे सोपे होणार आहे.
corona warehouse will be established in kanjurmarg and bhandup jumbo facility will be created
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.