मुंबई

हिमालयाचा पुलाचा पालिकेनं घेतला धसका, सहा पुलांची दुरुस्ती 5 कोटीने वाढली

समीर सुर्वे

मुंबई: फोर्ट येथील हिमालय पूल कोसळल्यानंतर महानगर पालिकेने सर्व पुलांचे पुन्हा ऑडिट करण्याचा करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे दुरुस्ती सुरु असलेल्या पुलांचेही ऑडिट करण्यात आले. त्यामुळे पुलांच्या दुरुस्तीत वाढ होऊन खर्चातही वाढ झाली आहे. दादर, माहिम परिसरातील सहा पुलांच्या दुरुस्तीचा खर्च पाच कोटी 23 लाखांनी वाढला आहे. यात पुलांची संरक्षक भिंत काढून त्या ठिकाणी कमी वजनाची मेंटल क्रॅश बॅरिअर बांधण्यात येणार आहे.

पुलांवर अतिरिक्त बांधकामाचा भार वाढल्याने हिमालय आणि अंधेरी येथील गोखले पुलाची दुर्घटना घडल्याचा निष्कर्ष चौकशी समितीने काढला होता. हिमालय पुलाच्या दुर्घटनेनंतर पालिकेने शहरातील सर्व पुलांचे पुन्हा ऑडिट करण्यात आले. त्यातही सल्लागारांनी पुलांवरील भार कमी करण्याची शिफारस केली आहे. त्यानुसार पुलावर झालेले कॉक्रिटीकरण कमी करणे त्या बदल्यात डांबरीकरण करणे तसेच सुरक्षा भिंत काढून त्या बॅरीअर बांधण्याची शिफारस करण्यात आली आहे.

हे ऑडिट होण्यापूर्वी पालिकेने दादर आणि माहिम परिसरातील सहा पुलांच्या दुरुस्तीसाठी कंत्राट दिले होते. त्यासाठी आठ कोटी 90 लाख रुपये खर्च करणार होती. मात्र,आता वाढलेल्या कामामुळे त्यात पाच कोटी 23 लाखांची भर पडली आहे.  या सहा पुलांच्या दुरुस्तीसाठी आता 14 कोटी 84 लाख रुपये खर्च करण्यात येणार आहे, असा दावा महापालिका प्रशासनाने केला आहे.

या वाढीव खर्चाला मंजूरी मिळण्यासाठी महानगर पालिकेनं ऑक्टोबर महिन्यात झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत हा प्रस्ताव मांडला होता. मात्र तेव्हा सदस्यांनी आक्षेप नोंदवले होते. त्या आक्षेपांवर प्रशासनाने खुलासा करुन पुन्हा प्रस्ताव मांडला आहे. 23 तारखेला होणाऱ्या स्थायी समितीच्या बैठकीत या प्रस्तावावर चर्चा होणार आहे.

--------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

cost repairing price six bridges Dadar Mahim increased 5 crore

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anil Deshmukh: माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या गाडीवर हल्ला; देशमुख गंभीर जखमी

Lawrence Bishnoi : बाबा सिद्दीकींच्या हत्येचा सूत्रधार अनमोल बिश्नोईला अमेरिकेत अटक

Mohol Assembly Election : अपक्ष उमेदवार क्षीरसागर यांनी दिला महाविकास आघाडीचे राजू खरे यांना पाठिंबा

43 Fours, 24 Sixes! आयुष शिंदेची Harris Shield स्पर्धेत ४१९ धावांची वादळी खेळी, वाचला सर्फराज खानचा विक्रम

Pune Assembly Eletion 2024 : मतदान केंद्रांच्या दोनशे मीटर परिसरात वाहने लावण्यास मनाई

SCROLL FOR NEXT