Mumbai News: मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वे वर रस्ता ओलांडणाऱ्या एका व्यक्तीचा वाहनाने दिलेल्या धडकेत मृत्यू झाला आहे. पनवेलजवळील आदई गावाच्या पुलाखाली गुरुवारी मध्यरात्री ही घटना घडली आहे. या प्रकरणी खांदेश्वर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.
मूळचा मध्य प्रदेशातील असणारा सुनील गुर्जर (३०) हा पनवेलजवळील आदई गावालगतच्या पुलाखालून मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे ओलांडत होता. याचवेळी पुण्याहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या एका वाहनाने त्याला धडक दिली. त्यात गंभीर जखमी झालेल्या सुनीलचा रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू झाला होता. या घटनेनंतर फरारी झालेल्या वाहनचालकाचा शोध सुरू आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.