मुंबई

लॉकडाउनमध्ये वाढला 'कोर्ट मॅरेज'चा ट्रेंड!

- सुनीता महामुणकर
  • लॉकडाऊनपूर्वी दररोज सुमारे २५ ते ४० कोर्ट मॅरेज होत होती, पण आता...

मुंबई: एकीकडे कोरोना संसर्गामुळे (Coronavirus) लग्न समारंभावर (Marriage Ceremony Restrictions) मर्यादा येत असली, तरी दुसरीकडे कोर्टात विवाह (Court Marriage) करण्याचा ट्रेंड (Trend) मात्र वाढत असल्याचे चित्र आहे. विवाह नोंदणी (Registration) कार्यालयाचे काम ऑनलाईन (Online) सुरू असल्यामुळे आणि अतिरिक्त खर्च टाळण्यासाठी 'कोर्ट विवाहा'चा पर्याय तरुणाईकडून (Youth) रुढ होत असल्याचं दिसतंय. राज्य सरकारने 'ब्रेक द चेन' (Break the Chain) मोहिमेअंतर्गत लावलेल्या निर्बधांमुळे लग्न सोहळ्यांवर वेळेचे आणि संख्येचे बंधन आले आहे. अशी बंधने असूनही राज्यात काही ठिकाणी नियमांचे उल्लंघन करुन विवाह सोहळे आयोजित केले जातात. मात्र त्यातून कोरोनाचा संसर्गदेखील वाढत आहे. याचे सामाजिक भान ठेवून कोर्ट विवाह करण्याचा पर्याय राज्यात वाढताना दिसत आहे. मुंबई (Mumbai) आणि खार येथील विवाह नोंदणी कार्यालयांसह ठाणे (Thane), नागपूर (Nagpur), पुणे (Pune) इत्यादी ठिकाणीही हा ट्रेंड तुलनेने वाढल्याचं दिसतंय, अशी माहिती वकिल (Advocate) आणि या विभागामध्ये सहाय्यक म्हणून काम करणाऱ्यांंनी दिली. (Court Marriage trend is new normal in Lockdown period amid covid19 restrictions)

लॉकडाऊनमध्ये निर्बंध असले तरी आता लोकांना आणि विशेषतः तरुण पिढीला कोर्ट मॅरेज आकर्षित करत आहे. एकतर विवाह सोहळ्यात होणारा लाखो रुपयांचा खर्च वाचू शकतो आणि निर्बंध असल्यामुळे उगाच गर्दी करून आणि मोजक्या दहा पंधरा लोकांमध्ये लग्न करण्याची गरज नाही ही जाणीव निर्माण होत आहे. आम्हाला कोर्ट मॅरेजबाबत सल्ला विचारणारे आणि कोर्ट मॅरेज करण्याचा निर्णय घेणारे अनेक जण येतात. यामध्ये आता अधिक वाढ झाली आहे, असे एड रसिकलाल विंजुदा यांनी सांगितले. लॉकडाऊनपूर्वी दर दिवशी साधारणतः सुमारे २५ ते ४० कोर्ट मॅरेज होत असतील तर आता ही संख्या ७५ ते ८० पर्यंत होत आहेत. शिवाय याची नोंदणी पद्धत सोपी असल्यामुळे कार्यालयात नवरा नवरी आणि साक्षीदारांना बोलवून सुरक्षेचे नियम पाळले जातात, असेही त्यांनी सांगितले.

सध्याच्या काळात कोर्ट मॅरेज हा उत्तम आणि व्यावहारिक पर्याय विवाह इच्छुकांसाठी निर्माण झाला आहे. कोर्ट मॅरेज करुन मग नातेवाईकांना लौकडाऊननंतर स्नेहसंमेलन करण्याचा विचार करणे जास्त संयुक्तिक वाटत आहे. त्यामुळे नोंदणी पध्दतीने किंवा वैदिक पध्दतीने विवाह करण्यावर लोकांचा कल वाढत आहे. सामाजिक जाणीवेच्या द्रुष्टीने ही स्वागतार्ह बाब आहे असे एड गायत्री धामणसकर म्हणाल्या.

मुंबई आणि खारमध्ये विवाह नोंदणी कार्यालय असून त्यासाठी सुमारे तीस दिवस आधी अर्ज करावा लागतो. औनलाईनवर याचा तपशील उपलब्ध आहे. साधारण तीन साक्षीदारांची आवश्यकता असते. सुरक्षेचे नियम पाळून मोजक्या पाच सहा जणांना परवानगी दिली जाते. नागपूरमध्ये जानेवारीत सुमारे 650 विवाहांची नोंदणी झाली आहे तर नाशिकमध्ये मागील वर्षी सुमारे दिड हजार नोंदणी करण्यात आली.

पुण्यामध्येही कोर्ट मॅरेजचा टक्का वाढलेला आहे, असे समुपदेशक आणि वकिल अनिशा फणसळकर यांनी सांगितले. लोकांमध्ये ही जागरूकता निर्माण होत आहे कि आपण लग्नाचा प्रचंड खर्च टाळून तो अन्य अत्यावश्यक कामासाठी वापरु शकतो. त्यामुळे पुण्यात यापूर्वी जर तीस टक्के विवाह नोंदणी पध्दतीने होत असतील तर आता त्यामध्ये पन्नासपेक्षा जास्त टक्के वाढ झाली आहे, असे त्यांनी सांगितले. कोर्ट विवाह हे विशेष विवाह कायद्यानुसार होतात, याची माहितीदेखील मी आर्वजून लोकांना देते कारण भविष्यात काही वाद झाले तर या कायद्यानुसार त्यावर तोडगा निघू शकतो, असाही खुलासा त्यांनी केला.

लौकडाऊनमुळे कार्यालयांच्या वेळेवर आणि कर्मचारी संख्येवर मर्यादा आली आहे असली तरी कोर्ट मॅरेजसाठी अर्ज करणारे वाढले आहेत असे नोंदणी पध्दतीने विवाह करणार्यांना मार्गदर्शन करणारे नीरज पांडे यांनी सांगितले. एकप्रकारे हा चांगला पायंडा असून येत्या काळात ही पध्दत अधिक प्रसारित होईल, असे ते म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जनसंघ पक्ष म्हणून १९६२मध्ये निवडणुकीत उतरला; पहिल्या प्रयत्नात ० जागा, नंतर 'फिनिक्स'झेप, २०२४ मध्ये भाजपचा चढता आलेख किंगमेकर ठरला!

Maharashtra Assembly Election Result: भाजप पुन्हा नंबर वन, जवळपास ७० टक्के जागा जिंकण्याचा घडविला विक्रम

Maharashtra Election 2024: पंतप्रधान मोदींनी शिंदे-फडणवीस-पवारांचे केले अभिनंदन, म्हणाले, महाराष्ट्रात सत्याचा विजय

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: निकालाच्या दिवशी मुंबईत नक्की काय घडलं? वाचा एका क्लिकवर!

Daund Election Result 2024 : दौंड- राहुल कुल यांची हॅटट्रिक, १३ हजार मतांच्या फरकाने विजयी..!

SCROLL FOR NEXT