मुंबई

मोठी बातमी : धारावीतून कोरोना हद्दपार? असं मिळवलं कोरोनावर नियंत्रण...

सकाळवृत्तसेवा

मुंबई : धारावीत कोरोना नियंत्रणात आला आहे. येथे अवघा एक रुग्ण सापडल्याने सर्वानाच आश्चर्याचा धक्का बसला. आता धारावीने मोकळा श्वास घेतल्याचे दिसून येत आहे.  या भागातील छोटे मोठे उद्योग धंदे सुरू झाले आहेत.  मात्र येथून कोरोना हद्दपार झाला की नाही? असा प्रश्न सर्वाना पडला आहे.  मात्र कोरोनाबाबत काळजी न घेतल्यास कोरोनाचा पुन्हा वाढण्याचा धोका आहे. 

धारावी हा कोरोनाचा हॉटस्पॉट होता. आतापर्यत येथे 82 मृत्यू झाले तर इथली रुग्णसंख्या 3335 पर्यंत गेली होती. दररोज शंभरावर रुग्ण या ठिकाणी आढळत होते. त्यामुळे येथे कोरोनाची भीती निर्माण झाली होती. अजूनही लोकांमध्ये भीती आहे मात्र कोरोना रुग्ण कमी झाल्यामुळे इथल्या नागरिकांमध्ये हायसं वातावरण आहे. 

लॉकडाऊनमुळे या भागातील छोटे मोठे उद्योग धंदे ठप्प झाले होते. आता येथील उद्योग धंदे पुन्हा सुरू झाले आहेत. त्यामुळे धारावी गजबजून गेली आहे. लोकांमध्ये आता कोरोनाचे भय दिसत नाही. नागरिक भयमुक्त झाल्याचे दिसत आहे. 

कसे आले नियंत्रण

पालिका आयुक्त इकबाल सिंग चहल यांनी धारावीला भेट दिली होती. तो भाग त्यांनी पायी दौरा करून पाहिला होता. त्यांनी या भागावर लक्ष केंद्रित केले. सर्व यंत्रणा या भागात एकवटली. स्थानिक नागरिकांचा सहभाग घेतला. नागरिकांमध्येही जागरूकता निर्माण झाली. नागरिक, स्थानिक राजकीय कार्यकते, आरोग्य सेविका, शिक्षक, आरोग्य विभागाच्या टीम आणि स्थानिक डॉक्टर यांच्या प्रयत्नांमुळे कोरोनाचा आटोक्यात आल्याचे दिसत आहे.  

परप्रांतीयांचा परिणाम

लॉकडाऊनमुळे जगण्याचा प्रश्न निर्माण झाल्याने परप्रांतीय मजूर आपल्या गावी निघून गेले. रमजान ईदचा सण लॉकडाऊनमध्ये निघून गेला. त्या काळात पोलिसांनी कडक निर्बंध घातले त्याचाही परिणाम रुग्णसंख्या कमी होण्यावर झाल्याचे दिसून आले. 

सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर यांनी पोलिस, पालिका, राज्यसरकार आणि केंद्र सरकार  यांच्या समन्वयाने लोकांमध्ये कोरोनाबाबत जागृती निर्माण केली. शौचालयांची स्वच्छता, सॅनिटायझेशन, साफसफाई यावर लक्ष केंद्रित केले. मास्क घालणे बंधनकारक केले त्यामुळे कोरोनाचा आटोक्यात आल्याचे दिसत आहे. मात्र नागरिकांनी कोरोना हद्दपार होईपर्यंत निर्बंधांचे पालन करायाला हवे अन्यथा पुन्हा कोरोनाचा वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

covid 19 in Asias biggest slum dharavi is now under total control read inside story

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SA vs IND: भारताचा वर्षातील शेवटच्या T20I सामन्यात विक्रमी विजय! द. आफ्रिकेविरुद्ध मालिकाही जिंकली

Dolly Chaiwala: डॉली चायवाला भाजपचा स्टार प्रचारक! नागपूरमध्ये केला महायुतीसाठी प्रचार

Rohit Sharma दुसऱ्यांदा झाला बाबा! रितिकाने दिला मुलाला जन्म; हिटमॅन आता ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार?

Record Breaker: Sanju Samson ची शतकासह विश्वविक्रमाला गवसणी; तिलक वर्मासह नोंदवले मोठे विक्रम अन्... Video

Assembly Elections: २४ ते ३० मतदारसंघ महत्त्वाचे! दोन्ही आघाड्यांना बंडाचा फटका बसणार,'शांती' यज्ञासाठी पळापळ सुरू

SCROLL FOR NEXT