मुंबई

१५ ते १८ वर्षे वयोगटाला लसीकरण सुरु, लस घ्या - किशोरी पेडणेकर

सकाळ डिजिटल टीम

सध्या लसीकरणासाठी ९ लसीकरण केंद्र सज्ज असेल,तरी आगामी काळात महापालिकेकडुन प्रभाग लसीकरण केंद्र, शाळा या याठिकाणी लसीकरण सुरू केलं जाणार आहे.

कोरोना (Corona) विरुद्धच्या लढ्यातील पुढचा टप्पा आजपासून सुरु होत आहे. देशात आता १५ ते १८ वयोगटातील मुलांना कोरोना प्रतिबंधक लस (Vaccination) देण्यात येणार आहे. मुंबईत (Mumbai) ९ लसीकरण केंद्रावर आंपासून १५ ते १८ वयोगटातील मुलांचं लसीकरण होणार आहे. यात वांद्रे-कुर्ला संकूल कोविड लसीकरण केंद्रातून सकाळी ११ वाजता या मोहिमेचा शुभारंभ होणार मुंबई उपनगरचे पालकमंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) दूरदृश्य प्रणालीद्वारे करणार आहेत. मुंबई महापालिकेकडे सध्या आठवडाभर पुरतील एवढे ३ लाख डोस उपलब्ध आहेत ,लवकरच येत्या आठवड्यासाठी ९ लाख डोस मिळवण्याचे पालिकेचे प्रयत्न आहेत.

सर्व मुंबईकरांना विनंती, १५ ते १८ वर्षावरील मुलांना लसीकरण सुरु केलं आहे. मुंबईत ९ ठिकाणी हे लसीकरण असणार आहे. ९ ते ५ या वेळेत लस घेता येईल. या ९ केंद्रांवर लस मिळेल. याची यादी देण्यात आली आहे. नाव नोंदणी झाल्यानंतर मुलांना घेऊन जा. कोरोना आणि ओमिक्रॉनला दूर ठेवण्यासाठी लस घ्या असं आवाहन महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांनी केलं.

कुठे लस मिळेल ?

सध्या लसीकरणासाठी ९ लसीकरण केंद्र सज्ज असेल,तरी आगामी काळात महापालिकेकडुन प्रभाग लसीकरण केंद्र, शाळा या याठिकाणी लसीकरण सुरू केलं जाणार आहे. मुंबईतील लसीकरण केंद्रांची यादी पुढीलप्रमाणे

भायखळामधील रिचर्डसन ऍण्ड क्रूडास, भायखळा कोविड लसीकऱण केंद्र

शीव मधील सोमय्या मैदानावरील जम्बो कोविड लसीकरण केंद्र

वरळीतील एनएससीआय डोम जम्बो कोविड लसीकरण केंद्र

वांद्रे कुर्ला संकुलातील बीकेसी जम्बो कोविड लसीकरण केंद्र

गोरेगाव (पूर्व ) मधील नेस्को जम्बो कोविड लसीकरण केंद्र

मालाड (पश्चिम) मधील मालाड जम्बो कोविड लसीकरण केंद्र

दहिसर जम्बो कोविड लसीकरण केंद्र

कांजूरमार्ग (पूर्व) मधील क्रॉम्प्टन ऍण्ड ग्रीव्हज जम्बो कोविड लसीकरण केंद्र

मुलुंड (पश्चिम) मधील रिचर्डसन ऍण्ड क्रूडास मुलुंड जम्बो कोविड लसीकरण केंद्र

भायखळामधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर रेल्वे रुग्णालय येथे रेल्वे कर्मचाऱ्यांच्या १५ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांसाठीदेखील लसीकरण केंद्र आहे.

लस घेण्यासाठी पात्रता आणि नियम

2007 साली किंवात्यापूर्वी जन्मलेल्या मुलांना लस घेता येणार आहे , ही मुलं लसीकरणासाठी पात्र आहेत. मुलांना लसीकरणासाठी शाळेचे ओळखपत्र किंवा आधार ओळखपत्र लस घेण्याआधी घेऊन येणं अनिवार्य असेल. पालकांनी मुलांसोबत यावे अशी महापालिकेची विनंती आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांसोबत त्यांचे शिक्षक असतील. मुलांना कोवॅक्सिन लशीचे डोस देण्यात येतील. थेट केंद्रावर जाऊन नोंदणी करण्याची सुविधा उपलब्ध. पालकांच्या किंवा स्वतःच्या फोन क्रमांकावरून विद्यार्थ्यांनी नोंदणी करावी .

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kannad Assembly Election 2024 Result Live: पतीविरुद्धच्या लढतीत पत्नीची बाजी, संजना जाधवांची हर्षवर्धन जाधवांना धोबीपछाड

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाण्यासाठी निघाले

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates : डॉ. हिकमत उढाण यांचा 2309 मतांनी विजय, सहाव्यांदा टोपेंचा विजय रोखला

Pune: राहुल कुल यांच्या विजयाचा जल्लोष करताना माजी उपसरपंचाचा मृत्यू

Islampur Assembly Election 2024 Results : इस्लामपूर मतदारसंघावर जयंत पाटलांचंच वर्चस्व! निशिकांत पाटलांचा केला 'करेक्ट कार्यक्रम'

SCROLL FOR NEXT