rajesh tope sakal media
मुंबई

राज्यात फेब्रुवारीत कोरोना रूग्ण वाढू शकतात : राजेश टोपे

मुंबईकरांसाठी पोलिसांची नवी नियमावली जाहीर

निनाद कुलकर्णी

मुंबई : राज्यात कोरोना रूग्णांची संख्या फेब्रुवारी महिन्यात वाढू शकते, अशी शक्यता राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी व्यक्त केली आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील कोरोना (Corona Cases In Maharashtra) रूग्णसंख्या ओटोक्यात असली तरी हे संकट अद्याप संपलेले नाही. त्यामुळे नागरिकांनी कोरोना नियमांचे तंतोतंत नियम पाळणे आवश्यक असल्याचे ते म्हाणाले. सध्या राज्यात कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमिक्रॉनचा संसर्ग झालेल्या रूग्णांची संख्या 32 वर पोहचली आहे. (Omicron Cases In Maharashtra)

राज्यात आज चार ओमायक्रॉनबाधित (Omicron) रुग्णांची नोंद झालेली आहे. यापैकी दोन रुग्ण उस्मानाबादेतील, एक रुग्ण मुंबईतील आणि एक रुग्ण बुलढाणा येथील आहे. राज्यात आज 925 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 929 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, आज 10 रुग्णांच्या मृत्यूची (Corona Death) नोंद झाली आहे. राज्यात आतापर्यंत 64 लाख 94 हजार 617 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.72 टक्के आहे.

दरम्यान, आगामी काळात नाताळ सण येणार आहे. त्यानंतर लगेच 31 डिसेंबर साजरा करण्यात येणार आहे. त्यासाठी उगाच गर्दी करू नये, असे आवाहनदेखील टोपे यांनी नागरिकांना केले आहे. या काळात गर्दीमुळे कोरोना रूग्णसंख्या वाढू शकते, त्यामुळे नागरिकांनी शक्यतो नाताळा आणि नवीन वर्षाचे स्वागत घरात राहूनच करावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.

दरम्यान, पुढील महिन्यात म्हणजे जानेवारीमध्ये ओमिक्रोनचा संसर्ग राज्यात मोठ्या प्रमाणावर लोकांना झालेला आढळेल, अशी शक्यता आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत व्यक्त केल आहे. या बैठकीत लसीचे दोन डोस सर्वांना देण्यासाठी सर्व यंत्रणांनी सर्वतोपरी प्रयत्न करावे, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले.

मुंबईकरांसाठी नवी नियमावली

मुंबई परिसरामध्ये ओमिक्रॉनचे चार रुग्ण सापडल्याने आता मुंबई पोलिसांनी नवे निर्बंध लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. हे निर्बंध 16 डिसेंबर ते 31 डिसेंबरदरम्यान लागू असणार आहेत. आयोजित कार्यक्रमातील, सेवेशी निगडीत असणारे आयोजक, सहभागी, अभ्यागत, पाहुणे, ग्राहक या सर्वांचेच पूर्णपणे लसीकरण झालेले असणे अनिवार्य आहे.

  • कोणतेही दुकान, आस्थापना, मॉल, कार्यक्रम, मेळावे याठिकाणी आलेल्या व्यक्तींचे पूर्ण लसीकरण झालेले हवे. अभ्यागत, ग्राहक यांचेही लसीकरण झाले पाहिजे.

  • मुंबईतील सर्व सार्वजनिक वाहतूक सेवेने प्रवास करणाऱ्या व्यक्तींचे लसीकरण झाले असावे. पूर्ण लसीकरण न झालेल्या व्यक्तींना प्रवास करण्यावर बंदी असणार आहे.

  • महाराष्ट्रात येणाऱ्या किंवा प्रवास करणाऱ्या व्यक्तींचे पूर्ण लसीकरण अथवा ७२ तासांपूर्वी करण्यात आलेली आरटी पीसीआर चाचणीच वैध असणार आहे.

  • कोणत्याही कार्यक्रम, स्पर्धा, मेळावे, समारंभ याठिकाणी क्षमतेच्या 50 टक्केच लोक उपस्थित राहू शकतात. जर एकूण उपस्थित लोकांची संख्या १ हजारापेक्षा जास्त असल्यास स्थानिक प्राधिकरणाला याबाबत माहिती द्यावी लागणार आहे.

  • बंदीस्त सभागृह, बंदिस्त रेस्टॉरंट, हॉलमध्ये 50% क्षमतेपेक्षा जास्त लोकांना एकत्र येता येणार नाही.

  • मोकळ्या जागी 25% क्षमतेपेक्षा जास्त लोकांना एकत्र येता येणार नाही.

  • 31 डिसेंबर आणि ख्रिसमस निमीत्त होणा-या पार्ट्यांवर नजर ठेवण्याकरता प्रत्येक वॉर्ड मध्ये महापालिकेची 4 पथकं तैनात असतील.

  • नियम मोडणाऱ्या पार्ट्या आढळल्यास संबंधित रेस्टॉरंट मालक, हॉटेलमालक यांच्यावरही नियमाप्रमाणे कारवाई करण्यात येईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Election 2024: पंतप्रधान मोदींनी शिंदे-फडणवीस-पवारांचे केले अभिनंदन, म्हणाले, महाराष्ट्रात सत्याचा विजय

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाण्यासाठी निघाले

Daund Election Result 2024 : दौंड- राहुल कुल यांची हॅटट्रिक, १३ हजार मतांच्या फरकाने विजयी..!

सोलापूर जिल्ह्यातील ११ आमदारांनी किती घेतली मते? दुसऱ्या- तिसऱ्या क्रमांकावर कोण? जाणून घ्या, जिल्ह्यातील विजयी अन्‌ दुसऱ्या-तिसऱ्या क्रमांकावरील उमेदवारांची मते

Amol Javle Won Raver Assembly Election 2024 Result Live: रावेर विधानसभा मतदार संघातून अमोल जावळे विजयी

SCROLL FOR NEXT