करोना काळात ऑक्सिजन प्रकल्प कंत्राटात सहा कोटींच्या गैरव्यवहारप्रकरणी नागपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. हायवे कन्स्ट्रक्शन कंपनीचे रोमिन छेडा, महापालिकेचे संबंधित अधिकारी आणि इतरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांची आर्थिक गुन्हे शाखा करणार आहे.रोमीन छेडा हे आदित्य ठाकरेंचे निकवर्तीय असल्याचे सांगण्यात येत आहे. किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषद घेत याबद्दलचा खुलासा केला.
यापूर्वी रोमिन छेडाला मुंबईच्या राणीबागेत पेंग्विन आणण्याचं कंत्राट देण्यात आल्याचा आरोप करण्यात आला होता. परंतु त्यावर विरोध झाल्यानंतर रोमिन छेडाला ब्लॅकलिस्ट केलं होतं. परंतु, त्याच रोमिन छेडाच्या कंपनीला उद्धव ठाकरे यांनी मुंबईच्या 13 रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन जनरेशन प्लान्ट सुरू करण्याचं कंत्राट दिलं.
त्यासाठी 140 कोटी रुपये देण्यात आले. रोमिन छेडा याने पैसे घेतले आणि केवळ 38 कोटींचे प्लान्ट उभारले. तसेच 102 कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप आहे.याशिवाय रोमीन छेडाला कॉन्ट्रॅक्ट देणारे पालिका आयुक्त इक्बाल चहल यांचीही चौकशी व्हायला हवी, असे भाजप नेते किरीट सोमय्याने म्हटले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.