Mumbai Covid Scam : कोरोना काळात मुंबईतील ऑक्सिजन प्लांट घोटाळ्याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने शुक्रवारी हायवे कन्स्ट्रक्शन कंपनीचा प्रमुख रोमिन छेडा याला अटक केली. गुन्हे शाखेने रोमिन याची गुरुवारी सलग आठ तास चौकशी केली होती.
(Romin Cheda arrested )
त्यानंतर शुक्रवारी त्याला अटक करण्यात आली. रोमिन याचे शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांच्याशी संबंध असल्याचा आरोप भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केला होता. आर्थिक गुन्हे शाखेने बुधवारी (ता. २२) रात्री नागपाडा पोलिस ठाण्यात त्याचा विरोधात गुन्हा दाखल केला होता.
रोमिन छेडा हे हायवे कन्स्ट्रक्शन कंपनीचे मालक असून या कंपनीला कोविड काळात ऑक्सिजन प्लांटशी संबंधित कंत्राट देण्यात आले होते. या सर्व प्रकरणात गैरप्रकार आढळल्याने आर्थिक गुन्हे शाखेने रोमिन याची चौकशी केली होती.
मुंबईच्या १३ रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन जनरेशन प्लान्ट सुरू करण्याचे कंत्राट होते. त्यासाठी १४० कोटी रुपये देण्यात आले. रोमिनने पैसे घेतले आणि केवळ ३८ कोटींचे प्लान्ट उभारले. तसेच १०२ कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप आहे.
पालिकेच्या व्ही. एन. देसाई रुग्णालय, बी. डी. बी. ए. रुग्णालय, जीटीबी, कस्तुरबा, नायर, कूपर, भाभा, केईएम आणि सायन रुग्णालयात ३० दिवसात ऑक्सिजन जनरेशन प्लांट उभारण्यासाठी कंत्राट देण्यात आले होते. कोणताही अनुभव नसताना आणि नियमांमध्ये बसत नसताना हे कंत्राट देण्यात आल्याचा आरोप आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.