मुंबई

Atal Setu: 'अटल सेतू'ला पडल्या मोठ्या भेगा; तीनच महिन्यांपूर्वी PM मोदींच्या हस्ते झालं होतं उद्घाटन

मुंबई ट्रान्स हार्बर लिंक (MTHL) अर्थात अटल सेतू मार्गावर काही ठिकाणी रस्त्याला मोठ्या भेगा पडल्याचा प्रकार समोर आला आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

मुंबई ट्रान्स हार्बर लिंक (MTHL) अर्थात अटल सेतू मार्गावर काही ठिकाणी रस्त्याला मोठ्या भेगा पडल्याचा प्रकार समोर आला आहे. काँग्रेस नेते नाना पटोले यांनी प्रत्यक्ष या ठिकाणी भेट देऊन तिथला व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यामुळं केवळ तीनच महिन्यात मोठा गाजावाजा करत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्घाटन झालेल्या या पुलाची ही दुरावस्था झाल्यानं हायकोर्टानं याची सुमोटो दाखल करुन याची चौकशी करावी अशी मागणी पटोले यांनी केली आहे. तर पटोलेंच्या आरोपांना एमएमआरडीएनं देखील उत्तर दिलं आहे. (Cracks seen on Mumbai trans Harbour Link Atal Setu Nana Patole demanded high court to take suomoto)

पटोलेंनी म्हटलं की, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते तीनच महिन्यांपूर्वी लोकार्पण झालेल्या 'अटल सेतू' या पुलाला भेगा पडल्याची बाब अतिशय चिंताजनक आहे. मोठ्या प्रमाणात भेगा पडल्यानं प्रवाश्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. बिहारमध्ये नुकताच बांधकाम सुरु असलेला पूल कोसळल्याची घटना ताजी असतानाच मुंबईतही हा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्यानं सरकारच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

काँग्रेस पक्षाच्या आंदोलनाचा भाग म्हणून सरकारचा भ्रष्ट कारभार उघड करण्यासाठी माझ्या सहकाऱ्यांसोबत या पुलाची पाहणी केली. ही बाब अत्यंत गंभीर असून आदरणीय हायकोर्टानं याची सुमोटो दखल घेऊन चौकशी करावी अशी आमची मागणी आहे.

एमएमआरडीएचं उत्तर

एमएमआरडीएनं या अटल सेतूची उभारणी केली आहे. या प्रकल्पाचे प्रोजेक्ट हेड कैलाश गनात्रा यांनी नाना पटोले यांचा हा दावा फेटाळून लावला आहे. त्यांनी म्हटलं की, "अटल सेतूला तडे गेल्याच्या अफवा पसरवल्या जात आहेत. मुख्य पुलाला तडे गेलेले नाहीत तर मुंबईच्या दिशेनं MTHLला जोडणाऱ्या अॅप्रोच रोडवर अर्थात सर्व्हिस रोडच्या सुरुवातीला हे तडे गेले आहेत. हा तात्पुरता रस्ता बनवला गेला होता.

हा मुख्य पुलाचा जोडरस्ता आहे, कोस्टल रोड बनू शकला नसल्यानं त्याला तात्पुरत्या स्वरुपात बनवलं गेलं आहे. खाडीच्या जवळचा हा रस्ता असल्यानं पहिल्या पावसात जमीन खचत असल्यानं अशा स्वरुपाचे छोट्या स्वरुपाचे हे तडे आहेत. यामध्ये फिलिंगचं काम आधीच सुरु झालं असून हे उद्यापर्यंत पूर्ण होईल. यामुळं वाहतुकीवर कुठलाही परिणाम झालेला नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Georai Crime : बुधप्रमुखांचा अर्ज भरण्यास गेलेल्या एकावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने तिघांकडून मारहाण, बीडच्या गेवराईतील घटना

Bharat Global Developers : बोनस आणि स्टॉक स्प्लिटचा डबल धमाका, कोणता आहे हा शेअर ?

Belrise Industries IPO Launch : बेलराईज इंडस्ट्रीज आणणार 2150 कोटीचा आयपीओ, डिटेल्स जाणून घ्या...

Udgir Assembly Elecion Result : पंचवीस टेबल, २६ राऊंडमध्ये होणार मतमोजणी; बारा वाजेपर्यंत ट्रेंड हाती येणार

Ramchandra Ingawale : राजकारणाचा नुसता चिखल झालाय; भूगावमधील १०९ वर्षीय रामचंद्र इंगवलेंची व्यथा

SCROLL FOR NEXT